त्या कारणामुळे येणार पुढची महामारी, केवळ हा उपायच वाचवेल प्राण, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 04:51 PM2022-10-21T16:51:15+5:302022-10-21T16:51:52+5:30
Pandemic: संपूर्ण जग गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाचा प्रकोप झेलत आहे. कोरोनामुळे जगभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कहर.अद्यापही सुरूच आहे. तसेच त्याचे नवनवे व्हेरिएंट लोकांना शिकार बनवत आहेत. यादरम्यान, शास्रज्ञांनी असा एक दावा केला आहे ज्याबद्दल ऐकून सर्वाचा थरकाप उडू शकतो.
नवी दिल्ली - संपूर्ण जग गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाचा प्रकोप झेलत आहे. कोरोनामुळे जगभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कहर.अद्यापही सुरूच आहे. तसेच त्याचे नवनवे व्हेरिएंट लोकांना शिकार बनवत आहेत. यादरम्यान, शास्रज्ञांनी असा एक दावा केला आहे ज्याबद्दल ऐकून सर्वाचा थरकाप उडू शकतो. आर्क्टिक लेकच्या अध्ययनातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग हे वेगाने विरघळत आहेत. त्यामुळे पुढील महामारी येण्याची शक्यत आहे. सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की कशाप्रकारे हिमनग विरघळल्यामुळे आजार पसरू शकतात. तसेच भविष्यात येणाऱ्या महामारीपासून कसा बचाव करता येईल.
द गार्जियनच्या रिपोर्टनुसार पुढील महामारी ही वटवाघळे किंवा पक्षांमुळे नाही तर बर्फ विरघळल्यामुळे येऊ शकते. जगातील सर्वात मोठ्या आर्क्टिक सरोवरातील जेनेटिक अॅनॅलिसिसनंतर शास्त्रज्ञांनी दावा केला की, हिमनग विरघळल्याने बर्फात दबून राहिलेले अनेक धोकादायक विषाणू आणि बॅक्टेरिया समोर येऊ शकतात. त्यामुळे पुढील साथ पसरू शकते. हिमनगांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि जिवाणू फ्रीज झालेले आहेत. ते बाहेर आपल्यावर त्यांच्यापासून संसर्ग होऊन ते हळहळू संपूर्ण जगात आजार पसरवू शकतात. कॅनडामधील ओटावा विद्यापीठातील संशोधकांनी हेजेन लेकमधील माती आणि पाण्याचे नमुने एकत्रित केले होते. त्यांच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील प्रीव्हेंटिव्ह हेल्थ डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉ. सोनिया रावत यांनी सांगितले की, कुठल्याही महामारीपासून बचावासाठी लोकांनी आपली इम्युनिटी (रोगप्रतिकार शक्ती) मजबूत केली पाहिले. ज्या लोकांची इम्युनिटी मजबूत असेल, ते भविष्यात येणाऱ्या साथींचा सक्षमपणे सामना करू शकतील. कुठल्याही संसर्गापासून बचावासाठी आपला इम्युन सिस्टिमचं योगदान हे महत्त्वाचं असतं. महामारीपासून बचावासाठी लससुद्धा उपयुक्त ठरू शकते. त्याशिवाय कोविडपासून बचावासाठी ज्या प्रकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जात आहे. तेसुद्धा भविष्यात उपयुक्त ठरणार आहेत.