प्रकृती अस्वास्थ्यामुळे रोहित वेमुलाच्या आईला रुग्णालयात केले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 10:27 AM2016-01-25T10:27:54+5:302016-01-25T10:29:13+5:30
हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आईच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २५ - हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींना शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन करणा-या रोहितच्या आईला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल संध्याकाळीच रोहितच्या आईच्या छातीत दुखू लागले होते, रात्री त्यांना उपचारांसाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही काळानंतर त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
रोहितच्या समर्थकांवर धारावीत हल्ला :
We sent Rohith’s mother to nearest multispeciality hospital. Presently she is in hospital: Dr Ravindra Kumar,CMO UoH pic.twitter.com/q8yDccoW8D
— ANI (@ANI_news) January 25, 2016