अमळनेर व धरणगावच्या जलपातळीत तीन मीटरने घट टंचाईची स्थिती बिकट : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण

By admin | Published: February 7, 2016 10:45 PM2016-02-07T22:45:30+5:302016-02-07T22:45:30+5:30

जळगाव : अत्यल्प पाऊस, शेती, व्यवसाय व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा रोजचा उपसा आणि मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड यासार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.

Due to the water level of Amalner and Dharangaon, the decrease in the density of three meters: the groundwater survey department conducted 178 wells | अमळनेर व धरणगावच्या जलपातळीत तीन मीटरने घट टंचाईची स्थिती बिकट : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण

अमळनेर व धरणगावच्या जलपातळीत तीन मीटरने घट टंचाईची स्थिती बिकट : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण

Next
गाव : अत्यल्प पाऊस, शेती, व्यवसाय व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा रोजचा उपसा आणि मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड यासार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.
आगामी काळातील टंचाईची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे आराखडा तयार करण्यात आला आहे. या वर्षी जिल्ह्यातील ५२६ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. त्यानुसार तालुकानिहाय विहिरींचे निरीक्षण भूजल सर्व्हेक्षण विभाग कार्यालयामार्फत करण्यात येत असते. सप्टेबर महिन्यातील अहवालानंतर या कार्यालयाने जानेवारी महिन्याच्या अखेर प्रत्येक तालुक्यातील विहिरीचे निरीक्षण करून भूगर्भातील जलपातळीची मोजणी केली आहे.

अमळनेर, चाळीसगाव व धरणगावात धोक्याची घंटा
भूजल सर्वेक्षण विभागातर्फे अमळनेर तालुक्यातील १४, , चाळीसगाव तालुक्यातील २१ व धरणगाव तालुक्यातील सात तर पारोळा तालुक्यातील १६ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या चारही तालुक्यांमध्ये अडीच ते तीन मीटरपर्यंत जलपातळीतील घट नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मोजणीत बोदवड तालुक्यात सर्वाधिक अडीच मिटरने जलपातळीत घट झाल्याची नोंद होती. त्यापाठोपाठ अमळनेर व चाळीसगाव तालुक्यात दीड मीटरने जलपातळीत घट झाली होती.
मुक्ताईनगर व भुसावळात अत्यल्प घट
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भूजलपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असताना मुक्ताईनगर, भुसावळ व एरंडोल तालुक्यात काहीशी स्थिती चांगली आहे. भुसावळ तालुक्यात ०.८८, मुक्ताईनगर तालुक्यात ०.९६ तर एरंडोल तालुक्यात १.०७ मीटरने भूजलपातळीतील घट नोंदविण्यात आली आहे.

इन्फो...
चोपडा, यावल व रावेरला मोठा फटका
सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे यावल, रावेर, चोपडा व भुसावळ तालुक्यांना दिलासा मिळाल्याने या तालुक्यातील जलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. पावणे तीन मिटरने यावल तालुक्यातील वाढ नोंदविण्यात होती. मात्र प्रचंड उपसा केल्यामुळे यावल तालुक्यात २.७७ मीटरने जलपातळीत घट झाली आहे. त्या पाठोपाठ चोपडा तालुक्यात २.५१ मीटरने तर रावेर तालुक्यात १.१६ मीटरने भूगर्भातील जलपातळीत घट झाली आहे. केळी आणि बागायती क्षेत्र असल्याने या तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने जलपातळीत घट होत आहे.

Web Title: Due to the water level of Amalner and Dharangaon, the decrease in the density of three meters: the groundwater survey department conducted 178 wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.