पाण्याअभावी साडे परिसरातील फळबागा धोक्यात
By admin | Published: February 17, 2016 12:24 AM2016-02-17T00:24:55+5:302016-02-17T00:24:55+5:30
साडे : गेल्या चार वर्षांपासून पाऊस नसल्याने साडे परिसरातील फळबागा पाण्याअभावी जळू लागल्या असून या भागात मोठय़ा प्रमाणात आंबा, केळी, द्राक्षे, लिंबोणी व चिक्कूच्या बागा आहेत. पाण्याअभावी ही सर्वच पिके जळू लागली आहेत.
Next
स डे : गेल्या चार वर्षांपासून पाऊस नसल्याने साडे परिसरातील फळबागा पाण्याअभावी जळू लागल्या असून या भागात मोठय़ा प्रमाणात आंबा, केळी, द्राक्षे, लिंबोणी व चिक्कूच्या बागा आहेत. पाण्याअभावी ही सर्वच पिके जळू लागली आहेत.गतवर्षी सरासरी कमी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच प्रकारची पिके धोक्यात आली आहेत. साडे परिसरात फळबागांनाही याचा फटका बसत असून या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. साडेचे सरपंच दत्तात्रय जाधव यांनी या परिसरात शासनाने रोजगार हमी योजनेंतर्गत पाणीपुरवठय़ाची सोय करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.