भरकटल्यामुळे ४५ देवमासे मृत्यूमुखी

By admin | Published: January 12, 2016 04:29 PM2016-01-12T16:29:03+5:302016-01-12T17:19:23+5:30

तूतीकोरिन जवळील तिरुचेंदुर बेटावर काल रात्री ४५ देवमासे मृत अवस्थेत दिसून आले . काल प्रशांत महासागरातून भरकटल्यामुळे १०० देवमासे तिरुचेंदुर बेटाच्या किनाऱ्यावर आले होते.

Due to the wreck, 45 Devams died | भरकटल्यामुळे ४५ देवमासे मृत्यूमुखी

भरकटल्यामुळे ४५ देवमासे मृत्यूमुखी

Next
>ऑनलाइन लोकमत
तूतीकोरिन (तमिळनाडु), दि. १२ -  तूतीकोरिन जवळील तिरुचेंदुर बेटावर काल रात्री ४५ देवमासे मृत अवस्थेत दिसून आले . प्रशांत महासागरातून भरकटल्यामुळे १०० देवमासे तिरुचेंदुर बेटाच्या किनाऱ्यावर आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  त्यामधील ४५ देवमासे मृत्यूमुखी पडले तर बाकीच्यानां मच्छिमारांच्या साह्याने मत्स्यपालन विभागाने समुद्रात सोडले पण ते मासे पुन्हा किनाऱ्याकडे येत असल्याचं चित्र दिसते आहे. 
देवमासे हे सुद्रातील खोलवर पाण्यात वास्तव्यास असतात पण पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या प्रमाणात देवमासे तमिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर आल्याचं दिसते आहे. 
स्थानिक जिल्हाधिकारी  एम. रविकुमार यांच्या माहितीप्रमाणे वाहून आलेले देवमासे अलानथलाई पासून कल्लामोझी बेटाच्या दरम्यान १६ कीमीच्या क्षेत्रात मिळाले. त्यांची लांबी ६ फूट ते १८ फूट असावी तर त्यांचे बजन १०० - २०० किलोच्या दरम्यान असल्याचं एम. रविकुमार यांनी सांगितले.
एम. रविकुमार यांनी येवढ्या प्रमाणात एकत्र देवमासे किणाऱ्यावर येण्याच कारण काय असावे ? याचा शोध घेणासाठी मरीन वैज्ञानिक आणि रामनाथपुरम येथिल समुद्री राष्ट्रीय उद्यानच्या संशोधनकर्त्याची मदत घेतली आहे.
स्थानीक लोकांच्या माहीतीप्रमाने भरकटून आलेल्या देवमास्यांच्या अंगावर जखमांच्या खूना दिसत होत्या काही देवमासे मृत झाले होते .

Web Title: Due to the wreck, 45 Devams died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.