डंपरने कारला चिरडले; पती-पत्नी ठार मन्यारखेडा फाट्याजवळ झाला अपघात : मुलगी गंभीर जखमी, डंपर चालक फरार
By admin | Published: December 27, 2015 12:18 AM2015-12-27T00:18:00+5:302015-12-27T00:18:00+5:30
नशिराबाद/जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या डपंर समोरुन येणार्या कारला जोरदार धडक दिल्याने त्यात कारमधील जयंत प्रभाकर शिंदे (वय ४४ रा.गजानन नगर, भुसावळ) व त्यांची पत्नी अर्चना शिंदे हे दोघेजण जागीच ठार झाले तर मुलगा शशांक (वय ९) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास महामार्गावरील मन्यारखेड्या फाट्याजवळ झाला. शिंदे हे रेल्वेत मालगाडीचे चालक होते.दरम्यान,याच जागेपासून काही अंतरावर दुपारी ट्रक व दुचाकीचा अपघात झाला होता.त्यात रेल्वेचेच निवृत्त चालक ज्ञानदेव शंकर कोळी हे ठार झाले होते.
Next
न िराबाद/जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या डपंर समोरुन येणार्या कारला जोरदार धडक दिल्याने त्यात कारमधील जयंत प्रभाकर शिंदे (वय ४४ रा.गजानन नगर, भुसावळ) व त्यांची पत्नी अर्चना शिंदे हे दोघेजण जागीच ठार झाले तर मुलगा शशांक (वय ९) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास महामार्गावरील मन्यारखेड्या फाट्याजवळ झाला. शिंदे हे रेल्वेत मालगाडीचे चालक होते.दरम्यान,याच जागेपासून काही अंतरावर दुपारी ट्रक व दुचाकीचा अपघात झाला होता.त्यात रेल्वेचेच निवृत्त चालक ज्ञानदेव शंकर कोळी हे ठार झाले होते.मृतदेह काढण्यास लागला सव्वा तासअपघात इतका भयानक होता की, कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. त्यात चालक शिंदे हे त्यात अडकले होते. मृतदेह हाताने काढण्याचा प्रयत्न केला असता निघत नव्हता. शेवटी क्रेन व लोखंडी टॅमीच्या सहायाने मृतदेह बाहेर काढावा लागला. यासाठी तब्बल सव्वा तास लागला. अर्चना शिंदे व शशांक यांना तातडीने गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अर्चना यांना मृत घोषित केले. तर जयंत शिंदे यांचा मृतदेह रात्री दहा वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.दुपारी ड्युटी करून शिंदे जळगावातजयंत शिंदे हे शनिवारी दुपारपर्यंत ड्युटीवर होते. त्यानंतर पत्नी व मुलाला घेऊन ते कारने जळगावात आले होते. काम आटोपून भुसावळला घरी जाण्यासाठी रात्री साडे सात वाजता ते जळगावातून निघाले. मन्यारखेडा फाट्याजवळ त्यांना समोरून येणार्या विना क्रमांकाच्या वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिली. त्यांच्या खिशातील ड्रायव्हींग लायसन्स व मोबाईलवरुन पोलिसांनी त्यांची ओळख पटविली. जळगावला मृतदेह आणल्यानंतर त्यांचे मित्र रेल्वे चालक राजेंद्र मुरलीधर बडगुजर यांनी पत्नीसह रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईक व मित्र परिवाराला घटनेची माहिती दिली.मुलगी औरंगाबादलाशिंदे यांना शशांक हा मुलगा व उर्वशी (वय १६) ही मुलगी आहे. उर्वशी ही औरंगाबाद येथे मामाकडे शिक्षणाला आहे. आईचे दोन वर्षापूर्वर्ी निधन झाले आहे. वडील वयोवृध्द असून भुसावळलाच राहतात. एक भाऊ व चार बहिणींचे लग्न झालेले आहे.१९९६ पासून ते रेल्वेत नोकरीला होते.