डुप्लीकेट चावीने उघडले कुलूप, काँग्रेस नेत्याच्या घरातून 70 लाखांची चोरी
By महेश गलांडे | Published: November 17, 2020 04:39 PM2020-11-17T16:39:52+5:302020-11-17T18:26:17+5:30
स्थानिक पोलिसांना सोमवारी सकाळी या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आणि स्निफर डॉगच्या मदतीने तपास सुरू आहे
इंदौर - मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथील माधवनगर परिसरातील काँग्रेस नेता आणि माजी खासदार रामसेवक सिंहचे पुत्र धर्मवीरसिंह गुर्जर यांच्या घरात चोरीची घटना घडली आहे. या चोरीत घरातील जवळपास 70 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच गुर्जर यांच्या निवास्थानी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
स्थानिक पोलिसांना सोमवारी सकाळी या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आणि स्निफर डॉगच्या मदतीने तपास सुरू आहे. मात्र, अद्यापही या चोरीचा उलगडा झाला असून चोरट्यांचा शोध घेण्यास पोलीस असमर्थ ठरले आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
माजी खासदार रामसेवक यांचे पुत्र धर्मवीरसिंह आपल्या कुटुंबासमवेत येथील बंगल्यात राहतात. सध्या दिवाळीसाठी त्यांच्या पत्नी माहेरी गेल्यामुळे घराला कुलूप लावण्यात आले होते. सकाळी जेव्हा घराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले, तसेच घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसल्यानंतर घरात मोठी चोरी झाल्याचा अंदाज दिसून आले. त्यानंतर, तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. चोरट्यांनी घरातील कपाटात बंद असलेले 35 लाख रुपयांचे दागिने आणि 35 लाख रुपये रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले.