भारीच! कॅन्सरग्रस्त वडिलांनी रिक्षा विकून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं; झाली 'अग्निवीर'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 04:50 PM2023-01-08T16:50:40+5:302023-01-08T16:57:44+5:30
रिक्षा चालकाची मुलगी तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने छत्तीसगडची पहिली महिला अग्निवीर झाली आहे.
एका रिक्षा चालकाची मुलगी तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने छत्तीसगडची पहिली महिला अग्निवीर झाली आहे. हिशा बघेल असं या मुलीचं नाव आहे. ती मूळची छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील बोरीगरका गावची रहिवासी आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती 2023 मध्ये तिने भाग घेतला होता. ज्यामध्ये तिची निवड झाली. आता हिशा ओडिशातील चिल्का येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
मार्चपर्यंत भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरतीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती महिला अग्निवीर म्हणून देशाचे रक्षण करेल. तिच्या या कामगिरीने केवळ तिचे कुटुंबीयच नाही तर गावकरीही खूश आहेत. एका शिक्षकाने सांगितले की, गावातील शाळेत शिकल्यानंतर हिशाने उतई कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. जिथून ती पहिली एनसीसी कॅडेट बनली. तिच्या या यशाबद्दल शिक्षकही आनंद व्यक्त करत आहेत.
Chhattisgarh| Durg girl Hisha Baghel selected for Agniveer scheme
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) January 7, 2023
I'm very proud. She's very hardworking & used to get up at 4am for training. We've sold our land&car & used the money for treatment of my husband who's suffering from cancer&to educate children:Hisha's mother(6.1) pic.twitter.com/D1ApjLoZOp
मुलीच्या यशाबद्दल, हिसाची आई सती बघेल म्हणाल्या, "माझ्या धाकट्या मुलीने गावातील मैदानात तरुणांसोबत एकट्याने धावण्याचा सराव सुरू केला. सप्टेंबर 2022 मध्ये तिने अग्निवीर योजनेंतर्गत नौदलात भरतीसाठी अर्ज केला. तेव्हा अधिकाऱ्यांनी फिटनेस पाहून तिची निवड केली. देशाच्या रक्षणाची शपथ घेऊन सैन्यात भरती होण्याची बरीच तयारी केली. मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे. तो खूप मेहनती आहे. ट्रेनिंगसाठी ती पहाटे 4 वाजता उठायची."
वडिलांच्या उपचारासाठी जमीन आणि रिक्षा विकली
हिशाच्या आईने सांगितले की, "आम्ही आमची जमीन आणि रिक्षा विकून ते पैसे माझ्या पतीच्या उपचारासाठी वापरले आहेत. हिशाच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे. उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही आमची रिक्षा विकण्याचा निर्णय घेतला.
शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा
आई पुढे म्हणाली, 'आम्हाला आशा आहे की आता आम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल.' त्यांनी सांगितले की, हिशाचे वडील गेल्या 12 वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी जमिनीसह वाहनाचीही विक्री केली. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.