नवरात्रोत्सवासाठी सजली देवीची मंदिरे दुर्गोत्सव: धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, घटस्थापनेची जोरात तयारी
By admin | Published: October 10, 2015 12:45 AM2015-10-10T00:45:52+5:302015-10-10T00:45:52+5:30
जळगाव-तीन दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेवल्याने शहरातील देवींच्या मंदिरे सजली असून उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. रंगरंगोटी, परिसर स्वच्छता पूर्णत्वाकडे आली असून कार्यक्रमांचे नियोजनही पूर्ण झाले आहे़
Next
ज गाव-तीन दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेवल्याने शहरातील देवींच्या मंदिरे सजली असून उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. रंगरंगोटी, परिसर स्वच्छता पूर्णत्वाकडे आली असून कार्यक्रमांचे नियोजनही पूर्ण झाले आहे़ भवानी माता मंदिर, कालिंका माता मंदिर आणि इच्छादेवी या प्रमुख मंदिरांमध्ये नवरात्रीमध्ये दर्शनासाठी देवीचे भक्त मोठ्या प्रमाणात येतात़ भक्तांच्या गर्दीने परिसर फुलून जातो़ परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते़ मंगळवारी घटस्थापना असून सकाळी साडेनऊ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्थापनेचा मुहूर्त आहे़ भवानी माता मंदिर, सुभाष चौक१९२४ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार झाला. त्याकाळात यासाठी १४ हजार ६७५ रूपये इतका खर्च आला होता़ जयपूर येथून सव्वादोन फुटाची देवीची आकर्षक मूर्ती आणण्यात आली होती. उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे़ नवरात्रात पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी सात वाजता नित्य आरती, दहा वाजता श्रीसुक्त म्हणून दुग्धाभिषेक, दुपारी १२ ला शृंगार व नैवेद्य आरती, सायंकाळी पावणेसातला संध्या आरती तर रात्री ११ ला शयन आरती होते. २१ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान नवचंडी पाठ आयोजित केले असल्याची माहिती मंदिराचे पूजारी महेश त्रिपाठी यांनी दिली़कालिंका माता मंदिर, भुसावळ रोडनवरात्री उत्सवात कालिंका माता मंदिर ट्रस्टकडून गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते़ यंदा देखील मंदिराच्या समोरील मैदानावर गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्षा शैला सरोदे यांनी दिली. नवरात्री उत्सवात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते़ त्यामुळे मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे़ मंदिरात आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे़ घटस्थापनेपासून दहा दिवस मंदिरात दररोज सकाळी साडेसहा वाजता काकडा तर सायंकाळी साडे सहा वाजता सायंआरती होते़ १७ रोजी सकाळी ११ ते १ गीता पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे़ २१ रोजी बुधवारी महाप्रसाद वाटप होणार आहे़ कालिंका माता मंदिरात नवरात्री उत्सवात गेल्या ३० वर्षांपासून ७२ वर्षीय शंकर फुसे स्वयंप्रेरणेने रंगकाम करीत आले आहेत़ यंदादेखील त्यांनीच संपूर्ण मंदिरात रंगकाम केले आहे़ नऊ दिवस त्यांचा मंदिरात मुक्काम असतो़