देगलुरात फळभाजी विक्रेत्यांचे आमरण उपोषण

By Admin | Published: December 21, 2015 12:02 AM2015-12-21T00:02:06+5:302015-12-21T00:02:06+5:30

देगलूर : भाजी मंडईतील फळभाजी विक्रेत्यांची (बागवान) दुकाने अतिक्रमणामध्ये नाहीत, असे सांगणार्‍या मुख्याधिकार्‍यांनी या मोहिमेमध्ये आमच्या दुकानांची तोडफोड करावयास लावून विश्वासघात केल्याचा ठपका ठेवीत देगलुरातील बागवानांनी आपले व्यवहार बंद ठेवून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे़

Durgurat bhalpaji vendors' death fasting | देगलुरात फळभाजी विक्रेत्यांचे आमरण उपोषण

देगलुरात फळभाजी विक्रेत्यांचे आमरण उपोषण

googlenewsNext
गलूर : भाजी मंडईतील फळभाजी विक्रेत्यांची (बागवान) दुकाने अतिक्रमणामध्ये नाहीत, असे सांगणार्‍या मुख्याधिकार्‍यांनी या मोहिमेमध्ये आमच्या दुकानांची तोडफोड करावयास लावून विश्वासघात केल्याचा ठपका ठेवीत देगलुरातील बागवानांनी आपले व्यवहार बंद ठेवून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे़
देगलूर नगर परिषदेने २५ वर्षापूर्वी फळभाजी विक्रीसाठी असलेल्या स्वतंत्र जागेवर व्यापारी संकुल बांधले असून सध्या नगरेश्वर मंगल कार्यालयाच्या पाठभिंतीस उद्यानासाठी राखीव असलेल्या ठिकाणी मंडई केली आहे़ अतिक्रमण मोहिमेदरम्यान बागवानांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी रामदास पाटील यांना विचारणा केली असता मंडईतील दुकानांचा अतिक्रमणामध्ये समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले व १७ डिसेंबर रोजी आमच्या दुकानावर जेसीबी चालविले असल्याचा ठपका ठेवण्यात आला़ मुख्याधिकार्‍यांनी आमच्या विश्वासघाताबरोबरच फळभाज्यांचे नुकसान केल्याचे बागवानांचे म्हणणे आहे़ त्यामुळे नुकसान भरपाईसह पुन्हा जैसे थे बसविण्याची मागणी करीत बागवानांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग पत्करला़ यामध्ये मोहम्मद सरवर मैनोद्दीन, अब्दुल गनी अहमदसाब, शेख इमाम महेबुबसाब, शेख नजीर तांबोळी, संजय गायकवाड, गोविंद सूर्यवंशी, विमलबाई कुद्रे यांचा समावेश आहे़
मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी बागवानांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत़ संबंधित फळभाजी विक्रेत्यांनी मंडईतील निश्चित करून दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा व्यापल्या आणि अन्य भाजीपाला उत्पादकांची अडवणूक चालविल्याचे अनेकांनी गार्‍हाणे सांगितले होते़ प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर ते खरे असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे अन्य भाजीपाला विक्रेत्यांच्या सोयीसाठी जास्तीच्या व्यापरलेल्या जागा मोकळ्या करणे आवश्यक होते़ पूर्वसूचनेची मुदतीत दखल घेतली गेली नसलयाने शेड काढून टाकण्याची कारवाई केल्याचे पाटील म्हणाले़

Web Title: Durgurat bhalpaji vendors' death fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.