अजबच! विद्यार्थिनी परीक्षा द्यायला आली अन् जुळ्या मुलांची आई झाली; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 10:55 AM2023-02-03T10:55:15+5:302023-02-03T11:01:07+5:30

परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी निशा कुमारी जुळ्या मुलांची आई झाली आहे.

during inter exam in begusarai student became mother gave birth to twin child | अजबच! विद्यार्थिनी परीक्षा द्यायला आली अन् जुळ्या मुलांची आई झाली; नेमकं काय झालं?

अजबच! विद्यार्थिनी परीक्षा द्यायला आली अन् जुळ्या मुलांची आई झाली; नेमकं काय झालं?

googlenewsNext

बिहारच्या बेगुसराय येथे परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी निशा कुमारी जुळ्या मुलांची आई झाली आहे. बिहारमध्ये इंटरमिजिएटची परीक्षा सुरू आहे. गुरुवारी एका विद्यार्थिनीला परीक्षेच्या दरम्यान अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यानंतर तिच्यासाठी एम्ब्युलन्स बोलावण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र बलिया येथे आणण्यात आले. विद्यार्थिनीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बलिया ब्लॉकच्या जीडीआर हायस्कूलमधील इंटर परीक्षा केंद्रात परीक्षेदरम्यान निशा कुमारीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. अचानक प्रसूती वेदना झाल्यास त्याची माहिती निरीक्षक व केंद्र अधीक्षकांना देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक-सह-केंद्र अधीक्षक अरविंद कुमार यांनी बलिया PHC मधून रुग्णवाहिका बोलावली आणि परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या ANM सोबत बलिया पीएचसीला पाठवलं. 

परीक्षार्थी निशा कुमारीने  जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. केंद्रीय अधीक्षक अरविंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेचा वेळ संपायला आला होता. याच दरम्यान, हीराटोल येथील रोशन यादव यांची पत्नी निशा कुमारी यांना असह्य प्रसूती वेदना होऊ लागल्या. प्रसूती वेदनांमुळे विव्हळत असलेल्या विद्यार्थिनीला रुग्णवाहिका बोलावून बलिया पीएचसीमध्ये पाठवण्यात आले, जिथे तिने एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला. 

विद्यार्थिनीची यशस्वी प्रसूती झाल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कुमार यांनी सांगितले. नवजात अर्भकाचे वजन कमी असल्याने बेगुसरायला चांगल्या उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान जुळ्या मुलाला जन्म दिल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: during inter exam in begusarai student became mother gave birth to twin child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.