बैठक चालू असताना महापालिकेचा अधिकारी पॉर्न क्लीप पाहत होता

By admin | Published: January 21, 2016 03:38 PM2016-01-21T15:38:24+5:302016-01-21T15:46:54+5:30

एका महापालिका अधिका-याला बैठक चालू असताना मोबाईलवर अश्लील क्लीप पाहताना पकडल्याची घटना भोपाळमध्ये घडली आहे.

During the meeting, the municipal officer was watching porn clip | बैठक चालू असताना महापालिकेचा अधिकारी पॉर्न क्लीप पाहत होता

बैठक चालू असताना महापालिकेचा अधिकारी पॉर्न क्लीप पाहत होता

Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २१ -  विधानसभेमध्ये आमदारांना मोबाईलवर अश्लील क्लीप पाहताना पकडल्याच्या काही घटना घडलेल्या असताना आता एका महापालिका अधिका-याला बैठक चालू असताना मोबाईलवर अश्लील क्लीप पाहताना पकडल्याची घटना भोपाळमध्ये घडली आहे. 
यासंबंधी न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार भोपाळ महापालिकेने महसूल वाढीसाठी काय उपायोजना कराव्यात यावर चर्चा करण्यासाठी महापालिका अधिका-यांची एक बैठक बोलवली होती. या बैठकीचे चित्रीकरण करण्यात येत होते.  
ही  बैठक चालू असताना झोन १० चे अधिकारी अमित शर्मा मोबाईलवर अश्लील क्लीप पाहत होते.  जेव्हा शर्मा यांना याबद्दल जाब विचारला तेव्हा त्यांनी आपण अश्लील क्लीप पाहत नसल्याचा दावा केला. मी मोबाईलवर दिसणारी जाहीरात बंद करत होतो. मी मोबाईल हाताळण्यात सक्षम नाही. त्यामुळे मोबाईल स्क्रीनवर सुरु असलेले दृश्य मी बंद करु शकलो नाही असे अमित शर्मा यांनी आपला बचाव करताना सांगितले. 
महापालिकेचे आयुक्त तेजस्वी एस नायक यांनी आपण अमित शर्माला कारणेदाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. 
 

Web Title: During the meeting, the municipal officer was watching porn clip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.