तिहारमध्ये केजरीवालांना पत्नीसोबत फेस टू फेस चर्चा करू दिली नाही, त्यांना.., संजय सिंह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 01:17 PM2024-04-13T13:17:36+5:302024-04-13T13:19:14+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंग प्रशासन अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला.

During Tihar jail arvind Kejriwal was not allowed to meet his wife face to face it was humiliating claims aap mp Sanjay Singh | तिहारमध्ये केजरीवालांना पत्नीसोबत फेस टू फेस चर्चा करू दिली नाही, त्यांना.., संजय सिंह यांचा दावा

तिहारमध्ये केजरीवालांना पत्नीसोबत फेस टू फेस चर्चा करू दिली नाही, त्यांना.., संजय सिंह यांचा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंग प्रशासन अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत सुनीता केजरीवाल यांना तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्याशी समोरासमोर भेटण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं. अधिकाऱ्यांनी त्यांना खिडकीतून केजरीवाल यांना भेटू दिलं. तिहार जेल प्रशासन भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 

तिहार तुरुंगात आमने-सामने भेटणं सामान्य बाब आहे. अरविंद केजरीवाल यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. भ्याड गुन्हेगारांनाही त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी आहे. तर दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केजरीवाल यांच्या पत्नीला आणि पीएला खिडकीतून भेटायला लावले जात आहे. असे अमानुष वर्तन का? असा सवाल संजय सिंह यांनी केला. हे कृत्य केवळ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अपमानित करण्यासाठी आणि निराश करण्यासाठी केलं जात आहे. आजचा लढा लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा असल्याचंही ते म्हणाले.
 


 

भेट रद्द केल्याचा आरोप
 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे खासदार अरविंद केजरीवाल यांची भेट तिहार तुरुंग प्रशासनाने शेवटच्या क्षणी रद्द केल्याचा आरोप आप नेत्यानं केला. यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आलं. "आम्हाला सांगण्यात आलं आहे की पंजाबचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खिडकीच्या चौकटीतून भेटावं लागेल. तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री यांचा अपमान करत आहात, अरविंद केजरीवाल यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहात. माझी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक रद्द करण्यात आली आहे," असंही ते म्हणाले.

Web Title: During Tihar jail arvind Kejriwal was not allowed to meet his wife face to face it was humiliating claims aap mp Sanjay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.