धुळीचे वादळ धडकले; संपूर्ण उत्तर भारतात हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:17 AM2018-05-08T02:17:19+5:302018-05-08T02:17:19+5:30

हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकले. धुळीचे पर्वत अंगावर कोसळावे अशा आकारात आलेल्या वादळाने अनेक जिल्ह्यांमध्ये क्षणात अंधार करुन टाकला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला.

Dusty storm hits; High alert in whole of north India | धुळीचे वादळ धडकले; संपूर्ण उत्तर भारतात हाय अलर्ट

धुळीचे वादळ धडकले; संपूर्ण उत्तर भारतात हाय अलर्ट

नवी दिल्ली : हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकले. त्यानंतर रात्री या वादळाचा तडाखा दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही बसला. या वादळामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशात वेगाने वारे वाहत असून, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.  

धुळीचे पर्वत अंगावर कोसळावे अशा आकारात आलेल्या वादळाने अनेक जिल्ह्यांमध्ये क्षणात अंधार करुन टाकला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला. तसेच वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी वीजही गेली होती. राजस्थानात आणि हरयाणात याचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान, रात्री हे वादळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले. या वादळामुळे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत मुसळधार पावसाचा तडाखाही उत्तर भारतात बसला. 





70 किमी वेग
एवढ्या गतीने उत्तर भारतात वादळी वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.





15 राज्यांना फटका
या वादळाचा हरयाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मिर आणि दिल्लीसह १५ राज्यांना फटका बसणार आहे.

दिल्लीत शाळा बंद : दिल्ली सरकारने वादळ धडकणार असल्याने खबरदारी म्हणून सायंकाळच्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी एक टीमही तयार ठेवली आहे.

Web Title: Dusty storm hits; High alert in whole of north India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.