तब्बल ३२ वर्षें ‘द्वारकाधीश’; आता साम्राज्य टिकवण्यासाठी युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 06:05 AM2022-11-29T06:05:12+5:302022-11-29T06:06:07+5:30

सलग सातवेळा जिंकलेले ‘भाजप’चेे माणेक आठव्यांदा रिंगणात

'Dwarkadish' for almost 32 years; Now the war to save the empire in gujarat election | तब्बल ३२ वर्षें ‘द्वारकाधीश’; आता साम्राज्य टिकवण्यासाठी युद्ध

तब्बल ३२ वर्षें ‘द्वारकाधीश’; आता साम्राज्य टिकवण्यासाठी युद्ध

Next

कमलेश वानखडे

द्वारका : श्रीकृष्णाने द्वारका येथून राजपाट चालविले. त्याच द्वारकेत ३२ वर्षांपासून भाजपचे आमदार पबुभा माणेक राज्य करीत आहेत. ७ निवडणुका सलग जिंकलेलेे पबुभा यावेळी आठव्यांदा भाजपकडून रिंगणात उतरलेेत. मात्र, यावेळी काँग्रेसचेे माजी आमदार मुळुभाई कंडोरिया त्यांना तगडी टक्कर देत आहेत. तर आपचे लखूभाई नकूम हे भाजपकडे जाणारी सतवारी समाजाची मते रोखत आहेत. त्यामुळे आता पबुभा यांनी आपले साम्राज्य वाचविण्यासाठी निवडणुकीला धर्मयुद्धाचे रूप दिले आहे.

पबुभा माणेक हे गेल्या तीन टर्म पासून भाजपचे आमदार आहेत. १९९० मध्येे क्षत्रीय वाघेेर समाजाचे असलेले पबुभा हे पहिल्यांदा अपक्ष लढत ‘द्वारकाधीश’ झाले. यावेळी काँग्रेसने मुळुभाई कंडोरिया यांना उतरविले आहे. कंडोरिया हे अहीर समाजाचे असून, त्यांना समाजात मोठा मान आहे. तेे ‘नाती’ समीकरणात माहीर असून, दलित व मुस्लीम समाजात त्यांची पकड आहे.

भाजपला 
का फटका?
n ‘आप’नेे दोन वेळा जिल्हा परिषदेचेे सदस्य राहिलेले सतवारा समाजाचे लखूभाई नकूम यांच्या हाती ‘झाडू’ दिला आहेे. सतवारा समाज दरवेळी भाजपसोबत राहायचा. 
n भाजपने या समाजाला उमेदवारी न दिल्याने सतवारा समाज नाराज असून तो ‘आप’ला माणूस म्हणून नकूम यांच्यामागे जाताना दिसत आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोमती घाटची दुरवस्था
द्वारका ही आस्थेची नगरी आहे. येथे आलेला भाविक गोमती नदीत डुबकी मारल्याशिवाय राहत नाही. मात्र, जुना गोमती घाटाची दुरवस्था झाली आहे. येथे अंघोळीनंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी सुरक्षित जागा नाही.

अतिक्रमणांमुळे रोष
बेट द्वारकेवर २ हजार घरांची वस्ती आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या तोंडावर येथील ३०० घरांचेे अतिक्रमण सरकारने काढून फेकले. यात बहुतांश मुस्लिमांची घरेे तुटली आहेत. बेट द्वारका नगरपरिषदेत भाजपचेे ४ नगरसेेवक मुस्लीम आहेत. मात्र, या अतिक्रमण कारवाईमुळे ते भाजपवर नाराज आहेत. यामुळे बेटावर भाजपला फटका बसू शकतो.

Web Title: 'Dwarkadish' for almost 32 years; Now the war to save the empire in gujarat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.