जिल्हा बँकेतर्फे खडका सूतगिरणीचे ई-ऑक्शन

By Admin | Published: November 9, 2016 09:44 PM2016-11-09T21:44:51+5:302016-11-09T21:44:51+5:30

जळगाव : भुसावळ तालुक्यातील खडका येथील सहकारी सूत गिरणीच्या ई-ऑक्शनची प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली आहे. मालमत्तेची जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे जी काय आहे या तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

E-auction of Khadka Sutagiri by District Bank | जिल्हा बँकेतर्फे खडका सूतगिरणीचे ई-ऑक्शन

जिल्हा बँकेतर्फे खडका सूतगिरणीचे ई-ऑक्शन

googlenewsNext
गाव : भुसावळ तालुक्यातील खडका येथील सहकारी सूत गिरणीच्या ई-ऑक्शनची प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली आहे. मालमत्तेची जशी आहे जेथे आहे आणि जशी आहे जी काय आहे या तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सहकारी सूतगिरणी, खडका, ता.भुसावळ या संस्थेकडे जिल्हा बँकेचे कर्ज थकित झाले आहे. ३१ ऑक्टोबर अखेर ६ कोटी ७९ लाख ३२ हजारांची रक्कम जिल्हा बँकेचे घेणे आहे. बँकेने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेटस ॲण्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत ताब्यात घेतलेल्या या सूत गिरणीच्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सूतगिरणीची राखीव किंमत ही ८ कोटी ९५ लाख २३ हजार इतकी ठेवण्यात आली आहे. तर ५० लाखांची रक्कम अनामत ठेवावी लागणार आहे. मालमत्ता पाहणीसाठी १० ते १३ नोव्हेंबर दरम्यानचा कालावधी दिला आहे. त्यानंतर १५ रोजी ई-ऑक्शन करण्यात येणार आहे. मालमत्तेच्या सातबारा उतार्‍यावरील बोझ्याच्या संदर्भातील कायदेशीर देण्याची जबाबदारी खरेदी करणार्‍याची राहणार आहे. नोंदणीसाठीचा संपूर्ण खर्च हा खरेदीदाराने करावा अशी अट टाकण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा बँके प्राधिकृत अधिकारी म्हणून एम.टी.चौधरी यांची नियुक्ती केली आहे.

Web Title: E-auction of Khadka Sutagiri by District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.