पॅन कार्डशी आधार जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाची "ई" शक्कल

By admin | Published: May 11, 2017 05:10 PM2017-05-11T17:10:47+5:302017-05-11T18:25:16+5:30

प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डला आधारशी जोडण्यासाठी नवी ई- सुविधा अस्तित्वात आणली आहे

"E" concept of Income Tax Department to add support to PAN card | पॅन कार्डशी आधार जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाची "ई" शक्कल

पॅन कार्डशी आधार जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाची "ई" शक्कल

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डला आधारशी जोडण्यासाठी नवी ई- सुविधा अस्तित्वात आणली आहे. या ई-सुविधेमुळे प्राप्तिकर परतावा भरताना तुमच्या पॅन कार्डसोबत आधार कार्डही नंबरही प्राप्तिकर विभागाला मिळणार आहे. प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in च्या होमपेजवर नवी लिंक सुरू करण्यात आली आहे. या लिंकच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला पॅन कार्डशी आधारला जोडण्यास सहजशक्य होणार आहे.

या लिंकवर गेल्यानंतर व्यक्तीला स्वतःचा पॅन आणि आधार नंबर देऊन आधार कार्डवरच नाव टाकावं लागणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं त्या व्यक्तीच्या नावाची आणि माहितीची खातरजमा केल्यानंतर त्या व्यक्तीचे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले जाणार आहे. जर त्यात काही व्यत्यय अथवा त्रुटी आढळल्यास आधारशी जोडण्यात आलेल्या मोबाईलवरून तुम्हाला वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येणार आहे. त्याद्वारे तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्डमधील माहिती दुरुस्तही करू शकता. या ई-सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. या ई-सुविधेचा कोणतीही व्यक्ती वापर करू शकते. कोणत्याही त्रासापासून वाचवण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डवरची जन्मतारीख एकसमान असणं गरजेचं आहे.
(पॅनसाठी आधार कार्ड का हवे?)
तत्पूर्वी पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर प्रश्नांचा मारा केला होता. सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले होते की, बनावट कंपन्यांच्या नावे रक्कम वळती करण्यासाठी बनावट पॅन कार्डचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
 
अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले होते की, सरकारला आढळून आले आहे की, बनावट रेशन कार्ड आणि दुसऱ्या कागदपत्रांच्या आधारे अनेक बनावट पॅन कार्ड मिळविण्यात आली आहेत. त्याचा उपयोग बनावट कंपन्यांना पैसा देण्यासाठी होत होता. एका व्यक्तीकडे अनेक पॅन कार्ड असल्याचे दिसून आले. त्यामुळे पॅन कार्डच्या अर्जासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे.
 

Web Title: "E" concept of Income Tax Department to add support to PAN card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.