सोळा अंकी क्रमांकाने ई-केवायसी; आधार क्रमांक द्यायची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:26 AM2018-07-02T01:26:08+5:302018-07-02T01:26:28+5:30
दूरसंचार कंपन्या तसेच अन्य सेवांकरिता इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक द्यायची इच्छा नसलेल्या ग्राहकाला युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (यूआयडीएआय) मिळणारा सोळा आकडी व्हर्च्युअल क्रमांक देता येईल. ही सुविधा रविवारपासून सुरू झाली.
नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्या तसेच अन्य सेवांकरिता इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक द्यायची इच्छा नसलेल्या ग्राहकाला युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (यूआयडीएआय) मिळणारा सोळा आकडी व्हर्च्युअल क्रमांक देता येईल. ही सुविधा रविवारपासून सुरू झाली.
कोणाही व्यक्तीच्या वैैयक्तिक माहितीचे संरक्षण व्हावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने सोळा आकडी व्हर्चुअल ओळख क्रमांकाची (व्हीआयडी) निर्मिती हे उचललेले पहिले पाऊल आहे. बँका व अन्य सेवांसाठी ही सुविधा ३१ आॅगस्टपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. एखाद्या सेवेसाठी ग्राहकाने आपला व्हर्च्युअल ओळख क्रमांक दिल्यानंतर तसे टोकन सेवा पुरविणाऱ्या कंपनीला प्राप्त होईल. सेवा पुरविणाºया कंपन्यांना ग्राहकाने आपली मर्यादित स्वरुपात माहिती पुरवावी असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. बँका व प्राप्तीकर खात्याला एखाद्या व्यक्तीची सर्व माहिती मिळविण्याची मुभा आहे. मात्र अन्य सेवा देणाºया कंपन्यांना आधारमधील नाव, पत्ता व छायाचित्र इतकीच माहिती मिळेल.
फेशियन रेकग्निशन तंत्रही वापरणार
आधारमधील माहिती सार्वत्रिक होऊ नये यासाठी आता संबंधित व्यक्तिची चेहºयावरुन ओळख पटविण्याचे तंत्रही यूआयडीएआयने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा देशात सर्वत्र येत्या आॅगस्टपासून उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहक देणार असलेल्या व्हर्चुअल ओळख क्रमांकाचा आपल्या यंत्रणेत वापर होण्यासाठी तांत्रिक सिद्धता करण्याकरिता बँका व अन्य सेवा कंपन्यांनाही पुरेसा वेळ मिळणार आहे. सेवा कंपन्यांनी व्हीआयडीचा वापर ३१ जुलैपासूनच सुरु केला तर त्यांना प्रत्येक व्यवहारासाठी आकारण्यात येणारा २० पैैसे दंड भरावा लागणार नाही.