Welcome 2021: ई-लर्निंग पकडेल स्पीड; मोबाइल, गुगल होतील 'गुरू'!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 03:31 PM2021-01-01T15:31:54+5:302021-01-01T15:41:49+5:30

अध्यापनाचा ढाचा बदलणार

e learning will catch up speed in 2021 Mobile Google will play key role | Welcome 2021: ई-लर्निंग पकडेल स्पीड; मोबाइल, गुगल होतील 'गुरू'!

Welcome 2021: ई-लर्निंग पकडेल स्पीड; मोबाइल, गुगल होतील 'गुरू'!

Next

कोरोनामुळे गेल्या वर्षात ऑनलाइन शिक्षणाचा उपाय अंमलात आणण्यात आला. ई-लर्निंग ही नवी पद्धत मूळ धरू लागली. त्यामुळे अध्यापनाचा ढाचाच बदलू लागला आहे. 

ऑनलाइन रोजगारांत वृद्धी
ऑनलाइन व्यवहारांमुळे या क्षेत्रातील रोजगारांत अधिकाधिक संधी असतील. त्यात बीपीओ, केपीओ, स्टार्टअप यांच्याबरोबरच ऑनलाइन ॲपचाही समावेश आहे. ॲपमुळे स्थानिकांना नव्या प्रकारचे रोजगार प्राप्त होऊ लागले आहेत, शिवाय शिक्षणाविषयीचे नवनवे ॲप विकसित करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.

शिक्षणपद्धतीच बदलेल
२०२१ पासून सुरू होणाऱ्या नव्या दशकात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यमान शिक्षणाचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे.

३-१८
या वयोगटांतील सर्वांना अनिवार्य शिक्षणाचा अधिकार बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा | पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या अभ्यासक्रमातही आमूलाग्र बदल | क्षेत्रीय ते राष्ट्रीय पातळीवर ऑलिम्पियाड परीक्षा | आवडीच्या विषयाचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य |  अनुभवावर अधिक भर

कौशल्य विकासावर भर
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये वाढ होईल, त्यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातच अनेक विदेशी विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षणाचाही फायदा विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

९५ लाख युजर्स यंदा ऑनलाइन शिक्षण घेतील
१.९६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल ई-लर्निंगचा कारभार

शिक्षणावर खर्च
भारतातील ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रगती दरवर्षी १५% होत आहे.

Web Title: e learning will catch up speed in 2021 Mobile Google will play key role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.