ई पलानीस्वामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

By admin | Published: February 16, 2017 01:04 PM2017-02-16T13:04:55+5:302017-02-16T16:49:56+5:30

तामिळनाडूत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात अखेर ई पलानीस्वामी यांनी गुरुवारी संध्याकाळी राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

E Palani Swami is the new Chief Minister of Tamil Nadu | ई पलानीस्वामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

ई पलानीस्वामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

Next

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 16 - तामिळनाडूत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात अखेर ई पलानीस्वामी यांनी गुरुवारी संध्याकाळी राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांची रवानगी  तुरुंगात झाली. मात्र तुरुंगात जाण्यापूर्वी शशिकलाने तिच्याशी निष्ठावंत असलेल्या पलानीस्वामी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. पनीरसेल्वम यांच्या मत्रिमंडळातील 31 मंत्र्यांना कायम ठेवले जाईल अशी माहिती आहे. 

राज्यपालांनी पलानीस्वामी यांना 15 दिवसात तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. ई. पलानीस्वामी यांनी पक्षाच्या समर्थक आमदारांची स्वाक्षरी असलेलं एक पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. त्यानंतर राजभवनाने ते पत्र प्रसिद्धीस दिलं आहे. 


ई पलानीस्वामी यांनी एआयएडीएमकेच्या 124 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर ओ. पनीरसेल्वम यांच्या गोटात फक्त दहाच आमदार आहेत. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण मिळाल्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाची धुरा शशिकला यांच्याच हातात राहणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यपाल पलानीस्वामी आणि शशिकलांनी रिसॉर्टमध्ये आमदारांना बंधक बनवल्याच्या प्रकरणाचाही बारकाईनं अभ्यास करत आहेत. त्यानंतर पलानीस्वामी यांच्याकडे समर्थक आमदारांचं बहुमत असल्यानंच त्यांना सरकार स्थापण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे, असं राजभवनातून सांगितलं जात आहे. ई पलानीस्वामी यांना आज संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे.

 

Web Title: E Palani Swami is the new Chief Minister of Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.