आणखी ३७ देशांसाठी आजपासून ई-टुरिस्ट व्हिसा

By admin | Published: February 26, 2016 03:48 AM2016-02-26T03:48:58+5:302016-02-26T03:48:58+5:30

सरकारने अत्यंत यशस्वी ठरलेली ई-टुरिस्ट व्हिसा (ई-टीव्ही)ची सवलत आज शुक्रवारपासून आणखी ३७ देशांच्या नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेच्या परिघात

E-tourism visa for more 37 countries today | आणखी ३७ देशांसाठी आजपासून ई-टुरिस्ट व्हिसा

आणखी ३७ देशांसाठी आजपासून ई-टुरिस्ट व्हिसा

Next

नवी दिल्ली : सरकारने अत्यंत यशस्वी ठरलेली ई-टुरिस्ट व्हिसा (ई-टीव्ही)ची सवलत आज शुक्रवारपासून आणखी ३७ देशांच्या नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेच्या परिघात येणाऱ्या देशांची संख्या आता १५० होणार आहे.
या योजनेत समाविष्ट नव्या देशांमध्ये आॅस्ट्रिया, झेक गणराज्य, डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका, अल्बानिया, बोसनिया व हर्जेगोविना, बोत्सवाना, ब्रुनेई, बुल्गारिया, केप वरदे, कोमोरोस, कोटे डी ल्वोयरे, इरिट्रिया, गोबान,जांबिया, घाना, इजिप्त, लायबेरिया, मेदागास्कर, मालावी, नामिबिया, रोमानिया, सेनेगल, सर्बिया, स्वाजीलँड, स्वित्झर्लंड, जांबिया, झिम्बाब्वे आदी देश आहेत.
आगमनाच्या वेळी टुरिस्ट व्हिसाची (टीव्हीओए) अंमलबजावणी इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल आॅथरायझेशनच्या (इटीए) माध्यमाने केली जात असून ई टूरिस्ट व्हिसाच्या नावाने ती लोकप्रिय आहे. २७ नोव्हेंबर २०१४ रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अर्जदारास ई मेलच्या माध्यमाने भारताच्या प्रवासाची परवानगी दिली जाते.
जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत एकूण ३,४१,६८३ पर्यटक ई टूरिस्ट व्हिसा घेऊन आले आणि यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या १२६८.८ टक्के अधिक आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: E-tourism visa for more 37 countries today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.