प्रत्येक कुटुंबाकडे २०२२ साली असेल स्वत:चे घर- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 06:00 AM2018-08-24T06:00:56+5:302018-08-24T06:01:18+5:30

गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या घरांच्या एक लाख लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते ई-गृहप्रवेश करून देण्यात आला.

Each family will have their own home in 2022- Modi | प्रत्येक कुटुंबाकडे २०२२ साली असेल स्वत:चे घर- मोदी

प्रत्येक कुटुंबाकडे २०२२ साली असेल स्वत:चे घर- मोदी

Next

जुजवा : देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजे २०२२ साली भारतातील प्रत्येक कुटुंबाकडे स्वत:च्या मालकीचे घर असायला हवे, असे स्वप्न मी पाहिले आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे काढले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणारी घरे उत्तम दर्जाची आहेत. ती बांधण्यासाठी कोणालाही एक रुपयाचीही लाच द्यावी लागली नाही, असेही पतंप्रधान म्हणाले. या योजनेंतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या घरांच्या एक लाख लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते ई-गृहप्रवेश करून देण्यात आला.
या लाभार्थ्यांशी वलसाडनजीक असलेल्या जुजवा गावी आयोजिलेल्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधान पुढे म्हणाले की, गुजरातकडून मला बरेच काही शिकायला मिळाले आहे. मी स्वत: पाहिलेली स्वप्ने ठराविक मुदतीत प्रत्यक्षात आणण्याची शिकवण धडा मला या राज्यानेच दिली आहे.

कुटुंबावरच माझा विश्वास
मोदी म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घरांचा उत्तम दर्जा पाहिल्यानंतर सरकारही अशी घरे बांधू शकते याच्यावर आता लोकांचा विश्वास बसेल. या योजनेसाठी सरकारने पैसे दिले परंतु ही घरे खऱ्या अर्थाने प्रत्येक कुटुंबाच्या निढळाच्या घामाने उभी राहिली आहेत. आपले घर कसे असावे, ते बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरावे या सगळ्याचा निर्णय संबंधित कुटुंबीयांनी घेतला आहे. आमचा विश्वास कंत्राटदारांवर नव्हे, तर कुटुंबावर आहे. जेव्हा एखादे कुटुंब स्वत: आपले घर बांधते, त्यावेळी ते उत्तम प्रतीचे होणारच, याची आपणास खात्री असते.

Web Title: Each family will have their own home in 2022- Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.