प्रत्येकवर्षी ३ लाख काद्यांच्या चाळी

By admin | Published: October 22, 2016 12:49 AM2016-10-22T00:49:41+5:302016-10-22T00:49:41+5:30

काही वर्षांपासून कांद्याचा भावामध्ये चढउतार होत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शासनाकडे असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ती अंत्यत तोकडी असल्याचे जाणविले. त्यासाठी प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

Each year, 3 lakh cardboard chawls | प्रत्येकवर्षी ३ लाख काद्यांच्या चाळी

प्रत्येकवर्षी ३ लाख काद्यांच्या चाळी

Next
ही वर्षांपासून कांद्याचा भावामध्ये चढउतार होत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शासनाकडे असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ती अंत्यत तोकडी असल्याचे जाणविले. त्यासाठी प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीसोबत जोडधंदे हवे
शेतकर्‍यांना पिकविता येते मात्र विकता येत नाही. त्यासाठी मार्केटिंग, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. सर्वांना रोजगार देण्याची क्षमता ही काळ्या आईमध्ये आहे. कृषी खात्याला नवी दिशा देण्यासाठी बांधावर जाण्याचे काम शासन करणार आहे. शेतकरी, सरकार आणि कृषि विभाग यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण हे गावांतच करण्याचे नियोजन आगामी काळात राहणार आहे.
शेतकरी राजा तू बाप, मी लेकरू
शेतकर्‍यांनी आपल्याला आमदार केलं. तुमच्यामुळे मी मंत्री झालो. तुम्ही माझ्या म्हातारपणाची व्यवस्था केली आहे. शेतकरी राजा माझा बाप आहे. लेकरू म्हणून मी बापाची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्य येईल तेव्हा फोन करा किंवा एसएमएस करा. मात्र आत्महत्या करू नका असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन संजय घुगे यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकटी

राज्याचा कृषिमंत्री तुझ्यासोबत आहे
भाजीपाला विनीयमन विधेयक पास झाल्यानंतर राज्यातील कृउबामध्ये आडत्यांनी भाजीपाला विक्रीला प्रतिबंध केला. दादर कृउबामध्ये पहाटे चार वाजता एक शेतकरी कोथिंबीरचे वाहन भरून घेऊन आला. आंदोलकांचा विरोध पाहता तो माल खाली उतरविण्यास घाबरत होता. राज्याचा कृषिमंत्री तुझ्या सोबत आहे. तू फक्त शेतमालाची विक्री कर असे सांगितल्यानंतर त्याला धीर मिळाला. आणि संपूर्ण चारचाकी भरून आणलेला माल पाहतापाहता विकला गेला. या घटनेनंतर आपल्यावर भरपूर टिका झाली. मात्र राज्याचा कृषिमंत्री शेतकर्‍याच्या पाठिशी आहे हा विश्वास मला शेतकर्‍यांमध्ये निर्माण करायचा होता.

शेतमालाचे पाकिट देऊन केले स्वागत
शेतकर्‍यांनी कृषी राज्यमंत्र्याचे हार किंवा पुष्पगुच्छ न देता ज्वारीचे कणीस, कपाशी, मका, मिरचीचे पाकीट देऊन स्वागत केले. शेतकर्‍यांनी ज्या पद्धतीने स्वागत केले त्याचा अर्थ या पिकांना भाव देऊन शेतकर्‍यांना न्याय द्यायचा असल्याचे तुम्ही मला सुचविले असल्याचे कृषि राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र आचारसंहिता असल्यामुळे कोणतीही घोषणा करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Each year, 3 lakh cardboard chawls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.