बंगालमध्ये पहाटे ईडीची कारवाई! टीएमसीचे नेते शाहजहान शेख यांच्या घरावर पुन्हा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:21 AM2024-01-24T08:21:47+5:302024-01-24T08:23:32+5:30
बंगालमध्ये आज पहाटेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान यांच्या शेख यांच्या घरावर छापा टाकला आहे.
बंगालमध्ये आज पहाटेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान यांच्या शेख यांच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीन आज पहाटे शेख यांच्या घराचे कुलूप तोडून घुसल्याचं सांगण्यात येत आहे. ईडीच्या टीमसोबत केंद्रीय दलाची टीमही हजर आहे. तृणमूल काँग्रेस नेते शाहजहान शेख यांच्या घरापासून ते रस्त्यापर्यंत केंद्रीय फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईडीच्या टीमसोबत जवळपास १०० सुरक्ष रक्षक आहेत, सुरक्षा रक्षकांनी शेख यांच्या घराला घेराव घातला आहे. दरम्यान, शेख यांच्या विरोधात ईडीने लुकआउट नोटीस जारी केले आहे.
रेशन घोटाळ्याप्रकरणी १९ दिवसापूर्वी ईडीची टीम टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकला होता, पण यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केला होता. यात ईडीचे अधिकारी जखमी झाले होते. यावेळी स्थानिक पोलिसांनीही ईडीच्या अधिकाऱ्यांकडे वॉरंट मागितले होते. दरम्यान. आज पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली आहे.
अयोध्येत श्रीराम लाट! पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले,गर्दीमुळे वाहनांना बंदी
स्थानिक पोलिसांना संपूर्ण धाडीची व्हिडिओग्राफी करायची होती, जी ईडीने नाकारली आहे. छाप्याच्या वेळी पोलिसांसोबत दोन साक्षीदार असतील, असं ईडीने सांगितले होते. यावेळी ईडीने शाहजहान शेख यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक पोलिसांना माहिती दिली होती, असं सांगण्यात येत आहे.
ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता
गेल्या काही दिवसापूर्वी ईडीने टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकला होता , यावेळी त्यांच्या समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केली. यात अधिकारी जखमी झाले होते. यावेळी माध्यमांच्या वाहनांवरही हल्ला झाला होता असं सांगण्यात येत आहे.