भूकंप आणि २६ तारखेचा विचित्र योगायोग !
By admin | Published: October 26, 2015 11:38 PM2015-10-26T23:38:17+5:302015-10-26T23:38:17+5:30
जगातील बहुतांश मोठ्या शक्तिशाली भूकंपांची तारीख २६ हीच असून सोमवारी पुन्हा एकदा हा विचित्र योगायोग जुळून आला असेच मानले जात आहे.
लखनौ : जगातील बहुतांश मोठ्या शक्तिशाली भूकंपांची तारीख २६ हीच असून सोमवारी पुन्हा एकदा हा विचित्र योगायोग जुळून आला असेच मानले जात आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागात २६ तारखेला भूकंपाचे हादरे बसले.
चीनमध्ये २६ जुलै १९७६, गुजरातमध्ये २६ जानेवारी २०११ रोजी आलेला भूकंप हिंद महासागरात २६ डिसेंबर २००४ रोजी आलेली सुनामी भयंकर विध्वंसाच्या कटू स्मृती जागवणाऱ्या आहेत. तैवानमध्ये २६ जुलै २०१० आणि जपानमध्ये २६ फेब्रुवारी २०१० रोजी विनाशकारी भूकंपात शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. यावर्षी २६ तारखेला भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले.
इतिहासावर नजर टाकल्यास २६ तारीख भूकंपाशी विचित्र नाते सांगणारीच ठरते. २६ जून १९२६ रोजी रोड्स येथे शक्तिशाली भूंकप झाला होता. फार मागे वळून बघता २६ जानेवारी १७०० रोजी उत्तर अमेरिकेतील शक्तिशाली भूकंपात शेकडो लोक ठार झाल्याची नोंद आहे. अगदी अलीकडे इराणमध्ये २६ डिसेंबर २००३ रोजी विनाशकारी भूकंपात किमान ६० हजारांवर लोक मृत्युमुखी पडले होते.
युगोस्लाव्हियामध्ये २६ जुलै १९६३ रोजी भूकंपाने आणि मेस्पी ज्वालामुखीने २६ आॅक्टोबर २०१० रोजी हाहाकार उडविला होता. २६ डिसेंबर १९९६ रोजी सबा येथे सागरी लाटांनी हजारो नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले होते. २६ डिसेंबर १९३९ रोजी तुर्कस्तानात भूकंपाने ४१ हजार लोकांना कवेत घेतले. चीनमधील कासू येथे २६ डिसेंबर १९३९ रोजी ७० हजार तर पोर्तुगाल येथे सुमारे ३० हजार लोक भूकंपात ठार झाले होते.