दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात 5.4 तीव्रतेचा भूकंप; पाकिस्तानतही जाणवले झटके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 01:54 PM2023-06-13T13:54:57+5:302023-06-13T14:07:28+5:30
अद्याप भूकंपात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती आलेली नाही.
Earthquake: आज(दि.13) दुपारी दीडच्या सुमारास भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव होता. भारतात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी मोजण्यात आली आहे.
Earthquake of Magnitude:5.4, Occurred on 13-06-2023, 13:33:42 IST, Lat: 33.15 & Long: 75.82, Depth: 6 Km ,Location: Doda, Jammu and Kashmir, India for more information Download the BhooKamp App https://t.co/OyJTMLYeSm@ndmaindia@Dr_Mishra1966@Indiametdept@KirenRijijupic.twitter.com/6Ezq3dbyNE
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) June 13, 2023
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे होता. त्याची खोली जमिनीच्या आत 6 किलोमीटर होती. हे धक्के बराच वेळ जाणवत होते. मात्र, आतापर्यंत भारत किंवा पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजली गेली आहे.
#WATCH | J&K | Basheer, a local from Srinagar speaks about the 5.4 magnitude earthquake that hit Doda, J&K at 1:33 pm this afternoon; says, "The tremors were quite strong. We too rushed out..." pic.twitter.com/rJr6wiq334
— ANI (@ANI) June 13, 2023
मार्चमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते
याआधी मार्च महिन्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी होती. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचा प्रभाव होता. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता.