आसामच्या नागावमध्ये भूकंपाचे धक्के, 4.0 रिश्टर स्केल तीव्रता; नागरिकांनी घर सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 05:29 PM2023-02-12T17:29:58+5:302023-02-12T17:36:04+5:30

आसाममधील नागाव जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.0 मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली.

earthquake f magnitude 4 0 richter scale occurred in nagaon assam | आसामच्या नागावमध्ये भूकंपाचे धक्के, 4.0 रिश्टर स्केल तीव्रता; नागरिकांनी घर सोडली

आसामच्या नागावमध्ये भूकंपाचे धक्के, 4.0 रिश्टर स्केल तीव्रता; नागरिकांनी घर सोडली

googlenewsNext

आसाममधील नागाव जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.0 मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही, पण नागरिकांनी भितीने घर सोडली.

रविवारी दुपारी ४.१८ वाजता भूकंप झाल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले.

गेल्या काही दिवपासूर्वी उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते.  तर काल एक दिवस आधी गुजरातच्या सुरत जिल्ह्यात 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च (ISR) च्या अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतच्या पश्चिम दक्षिण पश्चिम (WSW) सुमारे 27 किलोमीटर अंतरावर दुपारी 12:52 वाजता नोंदवला. या भूकंपाची नोंद 5.2 किमी खोलीवर झाली असून त्याचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील हझिराजवळ अरबी समुद्रात होता, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

Video: खासदार Jaya Bachchan संतापल्या; जगदीप धनखड यांना दाखवलं बोटं, कारण काय..?

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे विध्वंस झाला आहे. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये 28 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुर्कस्तानमध्ये एकापाठोपाठ पाच भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात भारताकडूनही मदत करण्यात आली आहे. 

एकाच दिवसात पाच वेळा भूकंप झाला तुर्कस्तानमध्ये 6 फेब्रुवारीला पहाटे 4.17 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 तीव्रता होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. लोक त्यातून सावरण्याआधी, थोड्या वेळाने दुसरा भूकंप झाला, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 तीव्रता होती.

Web Title: earthquake f magnitude 4 0 richter scale occurred in nagaon assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.