बिहार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात भूकंपाचे धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 11:22 AM2018-09-12T11:22:42+5:302018-09-12T11:24:53+5:30
बिहार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी रिश्टर स्केलवर मोजण्यात आली.
नवी दिल्ली : बिहार, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी रिश्टर स्केलवर मोजण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार परिसरात भूकंपाचे धक्के बसले. तर, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँडसह ईशान्य भारतातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. या भूंकपामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धावपळ सुरु झाली. तर, अनेकजण घरातून बाहेर येऊन रस्त्यावर थांबले. मात्र, या भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते.
Earthquake measuring 5.5 on the Richter scale hits parts of Assam. Tremors also felt in parts of West Bengal; visuals from Siliguri. pic.twitter.com/pixNPJ85or
— ANI (@ANI) September 12, 2018
दरम्यान, आज पहाटे जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 4.6 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. तर, हरियाणाच्या झज्जरमध्ये सकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. 3.1 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.
Earthquake measuring 5.5 on the Richter scale hits parts of Assam.
— ANI (@ANI) September 12, 2018