हरियाणा भाजपात भूकंप: एकामागोमाग एक धक्के; आमदारानंतर मंत्र्याचाही राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:58 PM2024-09-05T14:58:47+5:302024-09-05T14:59:21+5:30

भाजपाने बुधवारी रात्री ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात ९ आमदारांचे तिकीट कापले होते. यामुळे भाजपात असंतोषाची लाट उसळली आहे.

Earthquake in Haryana BJP: One shock after another; After the MLA, the Minister Ranjeet Singh Chautala also resigned | हरियाणा भाजपात भूकंप: एकामागोमाग एक धक्के; आमदारानंतर मंत्र्याचाही राजीनामा

हरियाणा भाजपात भूकंप: एकामागोमाग एक धक्के; आमदारानंतर मंत्र्याचाही राजीनामा

भाजपची हरियाणातील उमेदवारांची यादी जाहीर होताच एका मागोमाग एक असे दोन झटके पक्षाला बसले आहेत. एका आमदाराने रात्रीच राजीनामा दिलेला असताना आता मुख्यमंत्री सैनी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्याने आज दुपारी राजीनामा दिला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या रणजीत सिंह चौटाला यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

पक्षाने तिकीट न दिल्याने आपण राजीनामा दिला असल्याचे चौटाला यांनी स्पष्ट केले आहे. सैनी यांच्या कॅबिनेटमधून चौटाला यांनी राजीनामा देतानाच रानिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. 

भाजपाने बुधवारी रात्री ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात ९ आमदारांचे तिकीट कापले होते. यामुळे भाजपात असंतोषाची लाट उसळली असून भाजपा खासदाराच्या आईनेच तिकीट न मिळाल्याने बंडाचे निशान फडकावले आहे. माजी मंत्री सावित्री जिंदल यांनीही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यांचा मुलगा नवीन जिंदल हे खासदार आहेत. 

यापूर्वी  माजी खासदार सुनिता दुग्गल यांना तिकीट दिल्याने विद्यमान आमदार लक्ष्मण नापा यांनी भाजपाला रामराम केला आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांना राजीनामा पाठविला आहे.

सैनींचा मतदारसंघ बदलला...
सैनी हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी कर्नाल लोकसभा मतदार संघातून खासदार होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. कर्नाल विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. पोटनिवडणुकीत सैनी कर्नालमधून आमदार झाले. परंतू, यावेळी भाजपाने सैनींना कर्नालऐवजी लाडवामधून तिकीट दिले आहे. लाडवामध्ये काँग्रेसचा आमदार आहे. 
 

Web Title: Earthquake in Haryana BJP: One shock after another; After the MLA, the Minister Ranjeet Singh Chautala also resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.