Assam earthquake: सकाळी, सकाळी आसाम हादरले; 6.4 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 09:09 AM2021-04-28T09:09:37+5:302021-04-28T09:09:48+5:30
Assam earthquake today, Tremors In Northeast, North Bengal : आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसामला भूकंपाचा मोठा झटका बसल्याचे सांगितले. तसेच सर्व नागरिक सुरक्षित असल्याची मी प्रार्थना करतो. याचसोबत लोकांना सावध राहण्याची सूचना करत आहे. अन्य जिल्ह्यांमधून मी भूकंपाच्या तिव्रतेची माहिती घेत आहे, असे म्हटले.
आसामच्या गुवाहाटीसह पूर्वेकडील भागाला आज सकाळी भूकंपाचा मोठा (Assam earthquake) हादरा बसला. ७ वाजून ५१ मिनिटांनी आलेल्या या भूकंपामुळे घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. आसाममध्ये 6.4 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. (An earthquake with a magnitude of 6.4 on the Richter Scale hit Sonitpur, Assam today at 7:51 AM: National Center for Seismology)
भूकंपाचे केंद्र सोनिपतपूर असल्याचे सांगितले जात आहे. हा झटका काही मिनिटे बसत होता. यामुळे लोकांनी घराबाहेर येत बचाव केला. भूकंपाचा धक्का हा आसामसह उत्तर बंगालमध्येदेखील बसला. गुवाहाटीमध्ये काही ठिकाणी वीज गेली आहे. भूकंपाचे सलग दोन धक्के बसल्याचे सांगितले जात आहे. पहिला धक्का बसल्यानंतर काही वेळाने आणखी दोन धक्के बसल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत. यामुळे आसामच्या अनेक घरांना तडे गेले आहेत.
Big earthquake hits Assam. I pray for the well-being of all and urge everyone to stay alert. Taking updates from all districts: Assam CM Sarbananda Sonowal
— ANI (@ANI) April 28, 2021
(file photo)
A 6.4 magnitude earthquake hit Sonitpur, Assam today at 7:51 AM. pic.twitter.com/3g3U51Wd04
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसामला भूकंपाचा मोठा झटका बसल्याचे सांगितले. तसेच सर्व नागरिक सुरक्षित असल्याची मी प्रार्थना करतो. याचसोबत लोकांना सावध राहण्याची सूचना करत आहे. अन्य जिल्ह्यांमधून मी भूकंपाच्या तिव्रतेची माहिती घेत आहे, असे म्हटले.
भूकंपाचे फोटो...
Few early pictures of damage in Guwahati. pic.twitter.com/lTIGwBKIPV
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) April 28, 2021