म्यानमारमध्ये भूकंप; पूर्व भारत हादरला
By admin | Published: August 24, 2016 04:43 PM2016-08-24T16:43:30+5:302016-08-24T17:05:39+5:30
म्यानमारमध्ये भूकंपाचा धक्का बसल्याने पूर्व भारत हादरला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी मोजण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - म्यानमारमध्ये भूकंपाचा धक्का बसल्याने पूर्व भारत हादरला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी मोजण्यात आली आहे.
म्यानमारपासून पश्चिमेला 143 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मैकतिला याठिकाणी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 इतकी असल्याची माहिती अमेरिकेच्या भूवैज्ञानिक विभागाने दिली आहे.
या म्यानमारमधील भूकंपाचे धक्के भारतातील कोलकाता, झारखंड, बिहार आणि असाममध्येही जाणवले आहेत. दरम्यान, या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जिवीतहाणी झाली नसून काही भागातील लोक घाबरुन घरांतून रस्त्यांवर आल्याचे सजमते. .
Bihar: People evacuate their houses after earthquake tremors were felt in Patna. pic.twitter.com/EdiUQNKSNT
— ANI (@ANI_news) August 24, 2016