Earthquake news : नेपाळमध्ये भूकंप; दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले धक्के, 4.8 रिश्टर स्केल तीव्रता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:55 PM2023-02-22T14:55:24+5:302023-02-22T14:55:48+5:30
Earthquake news : नेपाळच्या जुमला परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
Earthquake news :दिल्ली एनसीआरमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.8 इतकी होती. याचे केंद्र नेपाळमधील जुमला येथून 69 किमी अंतरावर होते. मात्र, दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के सौम्य जणवले. सुदैवाने यात जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.
Earthquake of Magnitude:4.4, Occurred on 22-02-2023, 13:30:23 IST, Lat:29.56 & Long:81.70, Depth: 10 Km ,Location: 143km E of Pithoragarh, Uttarakhand, India for more information Download the BhooKamp App https://t.co/MNTAXJS0EJ@Dr_Mishra1966@Ravi_MoES@ndmaindia@Indiametdeptpic.twitter.com/ovDBNhb7VO
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 22, 2023
उत्तराखंडच्या पिथौरागढमध्येही भूकंप
याआधी बुधवारी दुपारी 1.30 वाजता उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 4.4 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी अंतरावर तर पिथौरागढपासून 143 किमी अंतरावर होता. त्या घटनेतही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाने हाहाकार
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के अशा वेळी आले आहेत, जेव्हा या महिन्यात तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाने मोठी हानी केली आहे. 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 46000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे 2 लाखांहून अधिक अपार्टमेंट उद्ध्वस्त झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्की-सीरिया सीमेवर होता.