भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली! पाकिस्तानात केंद्र, किती होती तीव्रता?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 02:12 PM2024-09-11T14:12:05+5:302024-09-11T14:14:05+5:30

Earthquake in Delhi : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यातही धक्के जाणवले. 

Earthquake shakes Delhi! Center in Pakistan, how much was the intensity? | भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली! पाकिस्तानात केंद्र, किती होती तीव्रता?

भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली! पाकिस्तानात केंद्र, किती होती तीव्रता?

Delhi Earthquake Updates : दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. बुधवारी (११ सप्टेंबर) दिल्लीसह शेजारी राज्यातही धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्र पाकिस्तानमध्ये होता. इस्लामाबाद आणि लाहोरही भूकंपाचे झटक्यांनी हादरले. 5.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप होता. 

दोन आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानी दिल्ली भूकंपच्या धक्यांनी हादरली. पाकिस्तानात केंद्रबिंदु असलेल्या भूकंपाचे धक्के दिल्लीबरोबर उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही जाणवले आहेत. 

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, यात कोणतीही जीवित वा मालमत्तांची हानी झालेली नाही. 

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजी म्हटले आहे की, दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी पाकिस्तानात भूकंपाचे धक्क जाणवले.

   
 
दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ५.७ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्ताना होते. 

Web Title: Earthquake shakes Delhi! Center in Pakistan, how much was the intensity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.