गुजरातला पुन्हा भूकंपाचे धक्के, काल रात्रीपासून अकरा वेळा हादरली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:45 PM2020-06-15T14:45:53+5:302020-06-15T14:48:08+5:30
. या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छपासून 15 किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर आले.
अहमदाबाद - काल रात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यानंतर आज पुन्हा एकदा गुजरातभूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. गुजरातमधील कच्छ येथे दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ एवढी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छपासून 15 किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर आले.
आज झालेल्या भूकंपाचे केंद्र भूजमधील भचाऊजवळ होते. दरम्यान, काल रात्रीपासून आतापर्यंत 11 वेळा भूकंपाचे छोटेमोठे धक्के जाणवले आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या जीवित वा वित्तहानीचे वृत्त आलेले नाही.
दरम्यान, काल रात्री संपूर्ण गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.५ एवढी नोंदली गेली होती. या भूकंपाचे केंद्र कच्छमधील भचाऊ येथे जमिनीपासून १० किमी खाली असल्याची माहिती देण्यात होती. दरम्यान, या भूकंपामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.