दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 09:41 AM2019-02-20T09:41:33+5:302019-02-20T09:41:43+5:30
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताला आज भूकंपाचे धक्के बसले आहे.
नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताला आज भूकंपाचे धक्के बसले आहे. आज सकाळी 7.59 वाजता राजधानीतल्या स्थानिकांनी हे भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचं केंद्रबिंदू दिल्लीजवळच्या उत्तर प्रदेशमधल्या बागपतमध्ये आहे. तत्पूर्वी 12 फेब्रुवारीला बंगालच्या खाडीत भूकंप आला, त्याचे झटके तामिळनाडूतल्या काही भागातही जाणवले होते. बंगालच्या खाडीत सकाळी 7.02 वाजता भूकंप आला होता, ज्याची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल होती. भूकंपाचे झटके चेन्नईतही जाणवले होते. त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू बंगालच्या खाडीजवळच्या समुद्रतळाशी 10 किलोमीटर खोलवर आहे.