उत्तर भारतात भूकंपाचे धक्के
By admin | Published: June 2, 2017 05:10 AM2017-06-02T05:10:56+5:302017-06-02T06:32:29+5:30
राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा काही भाग आज पहाटे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. दिल्ली आणि एनसीआर परिसरात
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा काही भाग आज पहाटे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. दिल्ली आणि एनसीआर परिसरात पहाटे 4.25 च्या सुमारास हा भूकंप जाणवला. दिल्लीबरोबरच हरयाणातील रोहतक परिसरातही भूपंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.00 मॅग्निट्युट इतकी नोंदवण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त आलेले नाही.
पहाटे दिल्लीसह हरयाणातील रोहतक परिसरात 5 मॅग्निट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. जोरदार धक्क्यांमुळे इमारती हलल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या भूकंपाचे केंद्र हरयाणामधील रोहतक येथे असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, साखरझोपेच्या वेळी भूकंप आल्याने उत्तर भारतात भीतीचे वातावरण पसरले होते.