दिल्लीसह एनसीआरला भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग केंद्रबिंदू

By admin | Published: February 6, 2017 10:53 PM2017-02-06T22:53:11+5:302017-02-06T23:36:46+5:30

दिल्लीतील एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. उत्तराखंडमध्ये भूकंपाचे केंद्रबिंद दाखवण्यात आला आहे.

An earthquake strikes the NCR with Delhi, the center of Rudraprayag in Uttarakhand | दिल्लीसह एनसीआरला भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग केंद्रबिंदू

दिल्लीसह एनसीआरला भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग केंद्रबिंदू

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 - दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयागमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवण्यात आला आहे. सोमवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. मसुरी, सहारनपूर, गाझियाबाद, चंदिगढ, ऋषिकेश आणि  डेहराडूनलाही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.

या भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. जमिनीच्या 33 किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर उतरले असून, दिल्लीतल्या रस्त्यांवर लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे. डेहराडूनमध्ये भूकंप बराच वेळ जाणवल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली आहेत. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागालाही या भूकंपाचे धक्के बसले आहेत.

पंजाबमध्ये भूकंप जाणवला असून, यात कोणतीही वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भूकंपानं कच्च्या दुकानांना धोका संभवण्याची शक्यता भूगर्भ वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. भूकंपानंतर आता सौम्य धक्के बसण्याची शक्यता आहे. मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्याचा अंदाज भूगर्भ वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. एनडीआरएफनं हाय अलर्ट जारी केलं असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भूकंपाचा अहवाल मागवला आहे. 

 

Web Title: An earthquake strikes the NCR with Delhi, the center of Rudraprayag in Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.