भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली-एनसीआर परिसर हादरला, भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:15 AM2023-11-04T00:15:30+5:302023-11-04T00:16:00+5:30
Earthquake : शुक्रवारी रात्री दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरं भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरलं. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.४ एवढी नोंदवण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरं भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरलं. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.४ एवढी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचं केंद्र नेपाळ असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले. अचानक जाणवलेल्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घरांबाहेर पडले. मात्र सध्यातरी कुठल्याही जीवित किंव वित्तहानीचं वृत्त आलेलं नाही.
पृथ्वीच्या खाली अनेक प्लेट असतात. त्यांच्या वेळोवेळी हालचाली होत असतात. त्यांची हालचाल झाल्यानंतर भूपृष्टावर भूकंपाचे धक्के जाणवतात. यातील अनेक धक्के हे सौम्य असतात. मात्र काही भूकंप हे विध्वंसक असतात.
Earthquake of Magnitude 6.4 strikes Nepal: National Center for Seismology
— ANI (@ANI) November 3, 2023
Strong tremors felt in Delhi pic.twitter.com/iz1OGy44cG