मोठी बातमी! दिल्लीसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:28 IST2023-01-24T15:13:52+5:302023-01-24T15:28:34+5:30
दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच उत्तराखंडची राजधानी डेहराडून, पिथौरागढ आणि अल्मोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

मोठी बातमी! दिल्लीसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये
दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच उत्तराखंडची राजधानी डेहराडून, पिथौरागढ आणि अल्मोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते. नागरिकांना हा भूकंप ऑफिस आणि घरांमध्ये जाणवला. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप दुपारी 2.28 वाजता झाला. त्याची तीव्रता 5.8 होती. भूकंपाचे केंद्र नेपाळपासून 10 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
An earthquake with a magnitude of 5.8 on the Richter Scale hit Nepal at 2:28 pm today: National Center for Seismology (NCS) pic.twitter.com/bAyESuuQFJ
— ANI (@ANI) January 24, 2023
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये आज दुपारी 2:28 वाजता 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ बिचिया नावाच्या ठिकाणी होता. जो नेपाळचा पश्चिम प्रांत आहे. नेपाळच्या या भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही जाणवले. दुपारी अडीच वाजता नेपाळपासून दिल्ली आणि यूपीपर्यंत अनेक ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के लोकांना जाणवले. भूकंपाचे हे धक्के सुमारे 10-15 सेकंद राहिले. त्यामुळे अनेकजण घाबरून घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले.
का होतो भूकंप?
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, त्या सतत फिरत राहतात. जिथे या प्लेट्स जास्त आदळतात, त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार आदळल्यामुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात. जर जास्त दाब असेल तर प्लेट्स तुटू लागतात आणि खाली असलेली ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधू लागते. यामुळे भूकंप होतो