BREAKING: दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, बराच वेळ जाणवले हादरे; नागरिकांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 10:39 PM2023-03-21T22:39:36+5:302023-03-21T22:40:15+5:30
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ इतकी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली-
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ इतकी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचं केंद्र तुर्कमेनिस्तन येथे असून भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्ये हादरे जाणवले आहेत.
#WATCH | Uttar Pradesh: People rush out of their houses in Vasundhara, Ghaziabad as strong earthquake tremors felt in several parts of north India. pic.twitter.com/wg4MWB0QdX
— ANI (@ANI) March 21, 2023
सीस्मोलॉजी विभागाच्या माहितीनुसार रात्री १० वाजून १७ मिनिटांनी अफगाणिस्तानपासून ९० किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतात दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे हादरे बसले. धक्का इतका तीव्र होता की काही सेकंद याचे हादरे जाणवत होते. यामुळे परिसरात घबराट पसरलेली पाहायला मिळाली. नागरिक खुल्या मैदानात बाहेर पडले होते.