जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; ५.५ रिश्टर स्केलची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:55 PM2023-12-18T17:55:33+5:302023-12-18T18:00:02+5:30
भूकंपाचे केंद्र लडाखमधील कारगिल प्रदेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आज दुपारी ३.३८च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू, श्रीनगर, पुंछ, किश्तवाडसह राज्यातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरने सांगितले की, रिश्टर स्केलवर ५.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाचे केंद्र लडाखमधील कारगिल प्रदेश असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांनी सांगितले की त्यांना दोनदा हादरे जाणवले. दुसरा धक्का पहिल्यापेक्षा कमी तीव्र होता. अनेक ठिकाणी लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले. अनेकांनी तात्काळ आपल्या नातेवाईकांना फोन करून भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती दिली आणि त्यांची प्रकृतीही विचारपूस केली.
An earthquake of magnitude 5.5 on the Richter Scale hit Kargil, Ladakh at around 3:48 pm today: National Center for Seismology pic.twitter.com/Z5bBYur7y4
— ANI (@ANI) December 18, 2023
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आत ७ प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि गडबड झाल्यानंतर भूकंप होतो.