PM मोदींचा अपमान मालदीवला महागात! EaseMyTrip चा मोठा निर्णय, विमानसेवांचे बुकिंग रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 08:59 AM2024-01-08T08:59:31+5:302024-01-08T09:04:24+5:30

PM मोदींबाबत आक्षेपार्ह विधाने करणे मालदीवला महागात पडणार असून, आता ही कंपनी ‘चलो लक्षद्वीप’ अभियान सुरू करत आहे.

ease my trip suspended all maldives flight bookings amid row over anti pm modi posts and will launch chalo lakshadweep tour | PM मोदींचा अपमान मालदीवला महागात! EaseMyTrip चा मोठा निर्णय, विमानसेवांचे बुकिंग रद्द

PM मोदींचा अपमान मालदीवला महागात! EaseMyTrip चा मोठा निर्णय, विमानसेवांचे बुकिंग रद्द

EaseMyTrip Support PM Narendra Modi: भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’हा ट्रेंड सुरू केला असून त्यात सेलिब्रिटींनीही उडी घेतली. यानंतर आता EaseMyTrip या ट्रॅव्हल कंपनीने या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, मालदीवला जाणाऱ्या विमानांचे बुकिंग रद्द केले आहे. कंपनीचे सीईओ निशांत पिट्टी यांनी एक्सवर यासंदर्भातील घोषणा केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, EaseMyTrip या कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाला समर्थन म्हणून EaseMyTrip ने मालदीवच्या सर्व विमानसेवांचे बुकिंग रद्द केले आहे, असे निशांत पिट्टी यांनी सांगितले आहे. 

EaseMyTrip ने सुरू करणार ‘चलो लक्षद्वीप’ अभियान

मालदीवला जाणाऱ्या विमानांचे बुकिंग रद्द केल्यानंतर आता EaseMyTrip कंपनीने ‘चलो लक्षद्वीप’ अभियान सुरू करणार आहे. लक्षद्वीप येथील समुद्र किनारे मालदीवसारखेच सुंदर आहेत. EaseMyTrip प्राचीन स्थळांचे पर्यटन वाढण्यावर भर देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीप दौरा केला आहे. लक्षद्वीपला जाण्यासाठी कंपनीकडून विशेष ऑफर असलेले टूर पॅकेज लवकरच आणले जाईल, असेही निशांत पिट्टी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदींविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर मालदीव सरकारने सारवासारव करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मरियम शिउना,  जाहीद रमीझ आणि महजूम माजिद यांना निलंबित केले. सदर प्रकाराबाबत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 
 

Web Title: ease my trip suspended all maldives flight bookings amid row over anti pm modi posts and will launch chalo lakshadweep tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.