पूर्व भारतातील रेल्वेंना लागेल सगळ्यात आधी जीपीएस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 03:12 AM2018-09-14T03:12:26+5:302018-09-14T03:12:53+5:30
डाटात हस्तक्षेपाबद्दल तीन अधिकारी निलंबित
नवी दिल्ली : रेल्वे नालासोपाराच्या बाहेर सिग्नलला उभी आहे आणि रेल्वे दाखवते आहे की ती मुंबई सेंट्रलला पोहोचली. अनेकवेळा अशी परिस्थिती तुम्हालाही तुमच्या शहराच्या स्टेशनवर अनुभवास आली असेल. ही तांत्रिक चूक नव्हे तर अनेक रेल्वे अधिकारी त्यांच्याकडील रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार असल्याचे दाखवण्यासाठी रेल्वेच्या लॉगर-डाटा मशीन किंवा त्यातील माहितीत (डाटा) हस्तक्षेप करतात.
हा प्रकार पकडल्यानंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सगळ्या रेल्वेगाड्यांच्या मूळ वेळांवर देखरेख ठेवण्यासाठी जीपीएस लावण्याचा आदेश दिला. याची सुरवात पूर्व भारत, बिहार-उत्तर प्रदेश-पश्चिम बंगाल-ओडिशाकडे जाणाऱ्या व येणाºया रेल्वेगाड्यांपासून होईल. या मार्गांवरील रेल्वे उशिरा धावत असल्याच्या सगळ्यात जास्त तक्रारी होत्या. शिवाय या मार्गांवर प्रवासीही प्रचंड आहेत.
गोयल म्हणाले, रेल्वेगाड्या आपल्या झोनमध्ये वेळापत्रकानुसार धावत आहेत हे दाखवण्यासाठी काहीच अधिकारी त्यांच्या येण्या-जाण्याच्या डाटामध्ये हस्तक्षेप करतात हे आमच्या निदर्शनास आले. याची चौकशी केली गेली व तीन जणांवर त्याचा ठपका ठेवला गेला. त्यांच्यावर कारवाई करून तिघांनाही निलंबित केले गेले.
आम्ही नियमितपणे वेळापत्रकाचे निरीक्षण करीत असून देशाच्या कोणत्या विभागात रेल्वेगाड्या उशिरा धावतात व त्यांची कारणे काय आहेत यासाठी आम्ही डाटा लॉगर लावले. त्यांचा अभ्यास केला जात आहे. लवकरच जीपीएस सगळ््या रेल्वेगाड्यांना लावले जातील. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कधीही त्याच्या मोबाईल फोनवर कोणत्याही रेल्वेचे नेमके ठिकाण (लोकेशन) पाहू शकेल. हे काम लवकरच सुरू केले जात आहे. सगळ््यात आधी कोलकाता लाईनवर धावणाºया रेल्वेगाड्यांना लावले जाईल, असे गोयल म्हणाले.
गोयल म्हणाले, रेल्वेगाड्या उशिराधावण्याचे कारण म्हणजे मर्यादित मार्गांवर जास्त रेल्वेंची वाहतूक असणे. रेल्वेमार्ग रिकामे असतील अशी पावले उचलली जात आहेत.
यात सगळ््यात महत्वाचे म्हणजे विशेष माल वाहतुकीचा मार्ग आहे. दिल्ली-मुंबई आणि लुधियाना-दिल्ली-सोनपूर दरम्यान जेव्हा याची निर्मिती होईल तेव्हा या मार्गावर फक्त रेल्वेची गती वाढेल, असेनाही तर प्रवाशी रेल्वेगाड्याही धावतील. याचा लाभ प्रवाशांना होईल वमालगाड्या या विशेष मार्गावर धावतील. याच प्रमाणे दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, दिल्ली चेन्नई, मुंबई-चेन्नई रेल्वे लाईनला पूर्णपणे इलेक्ट्रीक केले जाईल. यामुळे वेगातही वाढ होईल. याचप्रमाणे अनेक पावले रेल्वेची गती आणि क्षमता वाढवण्यासाठी उचलली जात आहेत, असे ते म्हणाले.