ईस्टर्नसाठी.....प्रती वाराणसीचे चेंबूरमध्ये दर्शन

By admin | Published: September 1, 2014 08:01 PM2014-09-01T20:01:04+5:302014-09-01T20:01:04+5:30

ईस्टर्नसाठी.....

For Eastern .. Visions of Varanasi in Chembur | ईस्टर्नसाठी.....प्रती वाराणसीचे चेंबूरमध्ये दर्शन

ईस्टर्नसाठी.....प्रती वाराणसीचे चेंबूरमध्ये दर्शन

Next
्टर्नसाठी.....

फोटो मेलवर आहेत.....
मुंबईकरांसाठी प्रती वाराणसीचे चेंबूरमध्ये दर्शन

चेंबूर: दरवर्षी देशातील विविध प्रार्थनास्थळांचे हुबेहुब देखावे सादर करुन मुंबईकरांना त्याचे दर्शन घडवणार्‍या चेंबूरच्या स‘ाद्री क्रीडा मंडळाने यंदा वाराणसीतील गंगा घाटाचा देखावा साकारला आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी टिळकनगरमध्ये पाहावयास मिळत आहे.
मुंबईत राहून देशातील तसेच राज्यातील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घडवून आणण्याचा मंडळाचा नेहमीच प्रयत्न असतो. यापूवी शनिवार वाडा, लाल किल्ला, डिस्ने लँड असे विविध देखावे मंडळाकडून साकारले आहेत. तर गेल्या वर्षी चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फिल्म सिटीचा देखावा उभारण्यात आला होता.
त्यामुळे यंदा गंगा नदीचे महत्त्व पटवून देणारा गंगा घाटाचा देखावा मंडळाने साकारला आहे. चित्रपटसृष्टीतील नामवंत कला निर्देशक तपन रॉय यांनी २१जूनपासून हा देखावा साकारण्यास सुरुवात केली. दोन महिने शंभर कामगारांनी अहोरात्र काम करुन हा देखावा उभारला आहे.
वाराणसीतील गंगा घाटावर शंभरपेक्षा अधिक घाट आहेत. मात्र, यातील भोसले घाट, तुलसी घाट, मनमंदिर घाट,अहिल्याबाई घाट, प्रयाग घाट,दिग्पतिया घाट, गंगामहल घाट, असे निवडक घाट या ठिकाणी साकारण्यात आले आहेत. ८० फूट बाय २०० फूट असा हा हुबेहूब गंगा घाटचा देखावा याठिकाणी उभारण्यात आल्याचे स‘ाद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज यांनी दिली. विशेष म्हणजे या गंगा घाटाच्या देखाव्यासाठी स‘ाद्री क्रीडा मंडळाने गंगा नंदीचे एक हजार लिटर पाणीदेखील आणले आहे. घाटावर असलेली मंदिरे आणि दिवे लागल्यानंतर गंगा घाटाचे उजळणारे मनोहारी रुप मुंबईकरांना येथे पाहायला मिळत आहे. मंडळाकडून सुरक्षेची खबरदारी म्हणून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सुमारे ५०० कार्यकर्ते सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: For Eastern .. Visions of Varanasi in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.