कुजबूज कुंकळ्ळी पालिकेच्या सोप्
By admin | Published: August 11, 2015 10:23 PM2015-08-11T22:23:16+5:302015-08-11T22:23:16+5:30
कुंकळ्ळी पालिकेच्या सोपोचे पैसे कुणाच्या खिशात ?
Next
क ंकळ्ळी पालिकेच्या सोपोचे पैसे कुणाच्या खिशात ? कुंकळ्ळी पालिका अनेक वेळा आर्थिक गैर व्यवहारासाठी बदनाम झालेली आहे. आता पालिकेच्या सोपो कराचेही गणित जुळत नसल्यामुळे हा कर पालिकेच्या तिजोरीत जातो की कुणाच्या खिशात याबाबत कुंकळ्ळीत कुजबुज सुरू झालेली आहे. पालिकेने बाजारात बसणार्या लहान विक्रेत्यासाठी सोपो गोळा करण्याचे कंत्राट बंद केले असून गेल्या दोन वर्षांत पालिकेचेच कर्मचारी सोपो कर गोळा करतात. मात्र, सोपो कर गोळा करणारे सर्व कर्मचारी रोजंदारीवर काम करणारे असल्यामुळे गोळा होणार्या सोपो करात प्रामाणिकता राहत नसल्याचा आरोप काही नगरसेवकच करायला लागले आहेत. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात असलेल्या फिरत्या गाडेवाल्यांकडून सोपो कर गोळा केला जातो. मात्र, त्यांना त्या बाबत रसीट दिली जात नसल्याच्या तक्रारी पालिकेच्या अधिकार्यांकडेही पोहचलेल्या आहेत. पालिका क्षेत्रात तीस हलते गाडेवाले व्यापार करतात. प्रत्येकाकडून दिवसाला पन्नास रुपये सोपो कर आकारला जातो. या फिरत्या गाडेवाल्यांकडून पालिकेच्या तिजोरीत महिन्याला चाळीस हजार रुपये व गावात फिरणार्या विक्रेत्यांकडून एकवीस हजार रुपये मिळून 61 हजार रुपये येणे अपेक्षित असले तरी यातील निम्मे पैसेही पालिकेच्या तिजोरीत जमा होत नाहीत असे पालिकेच्याच कर्मचार्यांचा आरोप आहे.हे पैसे कुणाच्या खिशात जातात हा शोधाचा विषय असला तरी पालिकेत हपापाचा माल गपापा अशीच स्थिती असल्याची कुजबुज आहे.