Narendra Modi News : कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 10:35 AM2021-03-06T10:35:54+5:302021-03-06T10:38:08+5:30

कोरोना लस (Corona Vaccination) घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (PM Narendra Modi) फोटो लावण्यात आला आहे. (eci directs centre to remove pm modi photo from corona certificate in assembly election states)

eci directs centre to remove pm modi photo from corona certificate in assembly election states | Narendra Modi News : कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश

Narendra Modi News : कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचे केंद्राला निर्देशकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पर्यायांची चाचपणीकोरोना लस प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election 2021) तारखा जाहीर केल्यानंतर सर्व पक्षीयांच्या प्रचाराला आता आणखी वेग आला आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (PM Narendra Modi) फोटो लावण्यात आला आहे. विरोधकांकडून या गोष्टीवर आक्षेप नोंदवला आला आहे. याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला निर्देश देत पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असे सांगितले आहे. (eci directs centre to remove pm modi photo from corona certificate in assembly election states)

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरीमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अलीकडेच जाहीर करण्यात आला आहे. पाचही राज्यांतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एकत्र ०२ मे रोजी मतमोजणी होईल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला काही निर्देश दिले आहेत.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठण्याची शक्यता

पंतप्रधान मोदींचा फोटो नको

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, कोरोना लस घेणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, तेथील कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. केंद्र सरकार आचार संहितेचे उल्लंघन करत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र, तो आरोप निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?

तृणमूल काँग्रेसचे खासदार डॅरेके ओब्रायन यांनी लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप नोंदवला होता. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे आणि यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर निवडणूक आयोगाने निर्देश देत याला पर्याय शोधावा, असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: eci directs centre to remove pm modi photo from corona certificate in assembly election states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.