आर्थिक विषमता देशाच्या विकासाला बाधक

By Admin | Published: July 22, 2015 12:34 AM2015-07-22T00:34:16+5:302015-07-22T00:34:16+5:30

फोटो आहे...

Economic inequality prevents the country's development | आर्थिक विषमता देशाच्या विकासाला बाधक

आर्थिक विषमता देशाच्या विकासाला बाधक

googlenewsNext
टो आहे...
सौरभकुमार : लायन्स क्लब ऑफ नागपूर-एमआयडीसीचा पदग्रहण समारंभ
नागपूर : आर्थिक विषमता देशाच्या विकासाला बाधक आहे. देशातील मागासवर्गीयांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणून ही विषमता दूर केली जाऊ शकते. या कार्यात सामाजिक संघटनांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे मत अंबाझरी आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक सौरभकुमार यांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ नागपूर-एमआयडीसीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये मंगळवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. पहिले व्हाईस डिस्ट्रक्टि गव्हर्नर राजे मुधोजी भोसले, रिजन चेअरपर्सन-२ विवेक चिब, झोन-१ चेअरपर्सन संदीप खंडेलवाल व्यासपीठावर उपस्थित होते. देशाचा विकास केवळ शासनाच्या भरवशावर होऊ शकत नाही. लायन्स क्लबसारख्या संघटनांनी पुढे येऊन देशाच्या विकासाचा भार उचलणे आवश्यक आहे, असेही सौरभकुमार यांनी सांगितले.
मुधोजी भोसले यांनी नवीन अध्यक्ष डॉ. रवींद्र गांधी यांना शपथ दिली. विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुरुवातीला मावळते सचिव जी.व्ही. अय्यर यांनी वार्षिक अहवाल तर, मावळते कोषाध्यक्ष शंतनू देशमुख यांनी जमाखर्चाचा अहवाल सादर केला.
------------
चौकट.....
नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष : डॉ. रवींद्र गांधी
सचिव : अरुण लांजेवार
कोषाध्यक्ष : औगुरी प्रसाद
मावळते अध्यक्ष : सुधीर शहलोत
उपाध्यक्ष-१ : राजेश धवन
उपाध्यक्ष-२ : जी.व्ही. अय्यर
उपाध्यक्ष-३ : अजय कपूर
सहसचिव : रोहिणी माहूरकर
सहकोषाध्यक्ष : मनजितसिंग परिहार
संचालक : राहुल बिंद, रजत कपूर, शंतनू देशमुख
पीआरओ : आदित्य वरणगावकर
टेल टिष्ट्वस्टर : वैभव तुरसकर
लायन टॅमर : सुनील भुते
सल्लागार मंडळ : ए.सी. कपूर, अनिरुद्ध माहूरकर, जी.एल. निमा, डी.एस. झा, गिरीश वझलवार, तरणजित सिंग.

Web Title: Economic inequality prevents the country's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.