दाऊद इब्राहिमवर इंग्लंडने लादले आर्थिक निर्बंध

By admin | Published: February 2, 2016 06:10 PM2016-02-02T18:10:07+5:302016-02-02T18:10:55+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीवर इंग्लंडने टाच आणली असून त्याचा समावेश आर्थिक निर्बंधांच्या यादीत केला आहे

Economic sanctions imposed by England on Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमवर इंग्लंडने लादले आर्थिक निर्बंध

दाऊद इब्राहिमवर इंग्लंडने लादले आर्थिक निर्बंध

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २ - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीवर इंग्लंडने टाच आणली असून त्याचा समावेश आर्थिक निर्बंध घातलेल्यांच्या यादीत केला आहे. भारतातला मोस्ट वाँटेड गुंड असलेल्या दाऊदचं नाव इंग्लंडच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या दस्तावेजात आलं असून २७ जानेवारी रोजी ही यादी अद्ययावत करण्यात आली आहे, आणि यामध्ये दाऊदचे चारही निवासाचे पत्ते पाकिस्तानमध्ये कराचीत असल्याचे नोंद करण्यात आले आहे.
दाऊद इब्राहिम कासकर घर क्र. ३७, ३० वा रस्ता, डिफेन्स, हाउसिंग अथॉरिटी कराची, घर क्र. २९, मरगल्ला रोड तसेच व्हाईट हाऊस व क्लिफ्टन येथे राहतो असं या दस्तावेजात म्हटलं आहे.
दाऊदचं राष्ट्रीयत्व भारतीय असून त्याचा पासपोर्ट भारताने रद्द केल्यानंतर त्याने भारतीय व पाकिस्तानी अनेक बनावट पासपोर्ट केले व त्याचा गैरवापर केला आहे, असेही यात म्हटले आहे.
दाऊदविरोधात आंतरराष्ट्रीय पकड वॉरंट असून प्रथम असे वॉरंट ७ नोव्हेंबर २००३ मध्ये जारी करण्यात आल्याचा तपशील देण्यात आला आहे.
या निर्बंधांमुळे दाऊदला इंग्लंडमध्ये आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, त्याच्या मालमत्ता आढळल्यास जप्त होतील.
जानेवारी २०१६मध्ये जारी केलेल्या या यादीत लिट्टे, खलिस्थानवादी संघटना आणि हिजबुल मुजाहिदीनचा समावेश आहे.

Web Title: Economic sanctions imposed by England on Dawood Ibrahim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.