अर्थमैत्री!
By admin | Published: September 2, 2014 03:23 AM2014-09-02T03:23:20+5:302014-09-02T03:23:20+5:30
जपान येत्या पाच वर्षात भारतात खासगी आणि सरकारी क्षेत्रत मिळून 34 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
Next
जपानचे साह्य : 5 वर्षात भारतात 34 अब्ज डॉलर्स गुंतविणार, नागरी अणुकरार मात्र नाही
तोक्यो : जपान येत्या पाच वर्षात भारतात खासगी आणि सरकारी क्षेत्रत मिळून 34 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. विशेष जागतिक भागीदारी मैत्री वाढविण्याचा भारत व जपानने निर्णय घेतला असला तरी नागरी अणुकरार मात्र होऊ शकलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्यात सोमवारी चर्चा झाली. तीत द्विपक्षीय संरक्षण संबंधांना महत्त्व देण्यात आले, तसेच संरक्षण क्षेत्रतच तंत्रज्ञान व उपकरणांसाठी मोठे सहकार्य करण्यास मान्यता देण्यात आली.
मोदी यांच्या पाच दिवसांच्या दौ:यात तिस:या दिवशी झालेल्या या चर्चेत सागरीकिना:यांच्या सुरक्षिततेसाठी यूएस-टू विमाने (जमीन व पाणी यावर वापरता येतील अशी) विकण्याच्या बोलण्यांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागरी अणुकरार या दौ:यात होईल अशी अपेक्षा होती. संयुक्त पत्रकार परिषदेत त्याबद्दल अबे म्हणाले, की दोन्ही देशांत भागीदारी बळकट होऊन निष्कर्ष निघण्यासाठी लवकर वाटाघाटी करण्यास अधिका:यांना सांगण्यात आले आहे. भारत व अमेरिका यांच्यात ज्या आधारावर अणुकरार झाला तसा तो जपानशी करण्यास भारत उत्सुक होता; परंतु जपानला मात्र त्यात तेवढी गोडी नाही. जपान येत्या पाच वर्षात भारतात पायाभूत सुविधा व स्मार्ट सिटी उभारण्याच्या कामात खासगी व सरकारी अशी 34 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, की भारत व जपानने विशेष व्यूहात्मक व जागतिक भागीदारी कराराद्वारे दोन्ही देशांच्या संबंधांना मोठे महत्त्व दिले आहे. या दौ:यामुळे दोन्ही देशांतील संबंधांची नवी पहाट उगवली
आहे. (वृत्तसंस्था)
च्मोदी यांनी येथील 136 वर्षे जुन्या शाळेला भेट देऊन जपानमधील शिक्षण पद्धत समजून घेतली. ही पद्धत भारतात अमलात आणली जाऊ शकते.
च्421 वे शतक ख:या अर्थाने आशियाचे असावे, यासाठी आशियातील देशांमध्ये भाषा आणि सामाजिक मूल्यांसाठी सहकार्य वाढावे, असे मोदी यांना वाटते. त्यासाठी त्यांनी जपानी भाषा शिकविण्यासाठी जपानच्या शिक्षकांनी भारतात यावे व ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करावेत, असे आवाहन केले.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मोठा हातभार
भारत-जपानमधील सहकार्यानुसार भारताला बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान आर्थिक, तांत्रिक आणि ऑपरेशनल साह्य देईल, असे शिंझो अबे म्हणाले. या प्रकल्पाचा मोदी सध्या सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.