अर्थव्यवस्था मंदावली, सरकारची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:20 AM2017-12-30T06:20:40+5:302017-12-30T06:20:56+5:30
२0१६-१७ या वित्तवर्षात अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची गती मंदावली आहे, अशी स्पष्ट कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली.
नवी दिल्ली : २0१६-१७ या वित्तवर्षात अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची गती मंदावली आहे, अशी स्पष्ट कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली. सरकारने म्हटले की, २0१५-१६मध्ये सकळ देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धीदर ८ टक्के होता. तो २0१६-१७मध्ये ७.१ टक्क्यांवर आला. तथापि, येणाºया काही तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर वाढेल, असे संकेत आर्थिक घडामोडींतून आहेत.
जेटली यांनी सांगितले की, आर्थिक वृद्धीच्या धिम्या गतीचे प्रतिबिंब उद्योग आणि सेवा क्षेत्रातील धिम्या वृद्धीत दिसून आले. अर्थव्यवस्था मंदीत येण्यामागे अनेक कारणे आहेत. संरचनात्मक, बाह्य, वित्तीय आणि मौद्रिक अशा कारणांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.
सभागृहात सांगण्यात आले की, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २0१४-१५, २0१५-१६ आणि २0१६-१७ या वित्तवर्षांत जीडीपीचा वृद्धीदर अनुक्रमे ७.५ टक्के, ८ टक्के आणि ७.१ टक्के राहिला. २0१७-१८च्या पहिल्या आणि दुसºया तिमाहीत जीडीपीचा वृद्धीदर अनुक्रमे ५.७ टक्के आणि ६.३ टक्के राहिला.
जेटली यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी असली तरी आंतरराष्टÑीय नाणेनिधीनुसार, २0१६मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती. २0१७मध्ये ती दुसºया क्रमांकाची सर्वाधिक गतिमान अर्थव्यवस्था राहिली.